Bay team aavaj marathi
मारुती जगधने पत्रकार नांदगाव {नाशिक}
नांदगाव तालुक्यातील ढेकू तांडा येथील रहिवासी गोरख सक्रु राठोड वय ३६ वर्ष धंदा ऊसतोड मजूर यांचे नांदगाव - छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर चाळीसगाव फाट्या जवळ असलेल्या विट भट्टी पासून हाकेच्या अंतरावर जळगाव बु|| शिवारात शनिवार दि २० रोजी दुपारी २.१५ वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजी नगर हून नांदगाव येथे येणार्या परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम. एच. १४ - बि. टी. १३०३ आणि वरील मयत व्यक्तीची एच एफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम. एच. ४१- बि.जे. ४४१३ यांची समोरासमोर धडक झाल्याने गोरख राठोड यांच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोरख सक्रु राठोड ऊसतोड कामगार कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडीत होते.कारखान्याचा पट्टा पडल्याने गावी आपल्या मोटारसायकल वर परतत असतांना शनिवारी अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की, डोक्याला मार लागल्याने व त्यांचे उजवा हात आणि पाय धडा वेगळे झाल्याने रक्त स्राव झाल्याने घटनास्थळी निधन झाले. परिवहन महामंडळाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकलचे सुमारे ४० हजार आणि परिवहन महामंडळाच्या बसचे २५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
मयत गोरख राठोड यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार असून गोरख यांच्यावर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरील घटनेची नांदगाव पोलिस ठाण्यात मयत व्यक्तीचा भाऊ साईनाथ राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज वाघमारे हे करत आहेत.
0 Comments