जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुमतेल येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न…

 Bay team aavaj marathi 

भरत पाटील पत्रकार जातेगाव नांदगाव 

शुक्रवार दिनांक १९ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुमतेल, ता नांदगाव येथे सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच संदीप पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास कोळपे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास नवगत विद्यार्थ्यांसोबत पालक ही मोठ्या संख्येने हजर होते, या कार्यक्रमास शंभर टक्के नवगत विद्यार्थी हजर झाल्याने शिक्षणा विषयी जनजागृती झाल्याचे चित्र दिसून आले. 

यासाठी पालकांची प्रत्यक्ष भेट व भ्रमणध्वनी द्वारे संपर्क यासारख्या माध्यमांचा वापर करून शाळेचे मुख्याध्यापक श्री अहिरे सर मेश्राम सर गायकवाड सर यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम आनंददायी संपन्न झाला या कार्यक्रमास गावातील विद्यार्थी तसेच पालकांचेही मोठ्या प्रमाणात योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments