उर्दू शाळेला सिंगल फेज विज रोहित्र

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार {नांदगाव}

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील उर्दू शाळेच्या विदयार्थ्यांच्या शिक्षणाची वीज पुरवठ्या अभावी हेळसांड होत असल्याची बाब येथील नागरिकांनी आ. सुहास कांदे यांच्याकडे मांडली असता, अण्णा साहेबांनी त्वरित तीन लाख ८० हजार रुपये किंमतीचे वीज रोहित्र स्वखर्चातून बसवून दिल्याने येथील व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोलठाण येथील या उर्दू शाळेला वीज पुरवठ्याची सोय नसल्याने संगणक शिक्षणासह, इतर सुविधा व तांत्रिक शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहत असल्याची बाब येथील शिवसेनेचे पदाधिकारी अनिल तात्या रिंढे व रफिक भाई पठाण यांनी आ. श्री.कांदे यांना सविस्तर माहिती दिली. त्यावर शाळेसाठी विजपुरवठा करणेसाठी सर्व तांत्रिक माहिती विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली असता तेथे स्वतंत्र रोहित्र बसविणे आवश्यक असल्याची माहिती मिळताच सुहास अण्णा यांनी स्वखर्चातून सिंगल फेज वीज रोहित्र उपलब्ध करून आज शनिवार दि. २० रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वाधीन केले. याप्रसंगी बोलठाण ग्रामस्थांच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आ. कांदे यांचे आभार मानले.

यावेळी बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, माजी सभापती विलासराव आहेर, तेज कवडे,हफरहान खान, मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, प्रकाश शिंदे, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब आव्हाड, मुक्ती अब्दुल हाफिज, सादिक सय्यद, उबेद सय्यद,जुनैद शा., उजेब शेख, शेख सलीम, अमजद सय्यद, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments