सरपंचपदी सौ.मोनाली सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ.कांदे यांच्याकडून शुभेच्छा

 Bay -- team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार नांदगाव [नाशिक]

नांदगाव तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे असलेल्या साकोरा ग्रामपालिकेच्या सरपंच पदी सौ .मोनाली सुर्यवंशी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ. सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी त्यांचा सन्मान आ. कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी त्यांचा सत्कार केला, व पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्यात.

गेल्या तीन महिन्यांपासून माजी सरपंच श्रीमती ताराबाई सोनवणे यांनी सरपंच पदांचा राजीनामा दिल्याने प्रभारी सरपंचपदी सौ.वंदना दुरडे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच पदासाठी आज म़ंगळवार रोजी विशेष सभा घेऊन निवडीची प्रक्रिया पार पडली, त्यात सर्वप्रथम सरपंच पदासाठी सौ.मोनाली सुर्यवंशी, वनिता बोरसे, प्रशांत बोरसे, किरण बोरसे यांनी अर्ज दाखल केले होते.

पैकी सौ.सुर्यवंशी वगळता इतर तीन ही सदस्यांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने सौ.मोनाली सुर्यवंशी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहील्याने दोन वाजता सरपंच म्हणून सौ.मोनाली मधुकर सुर्यवंशी यांची निवडणूक निर्णय अधिकारी K.U गायकवाड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले होते. त्यांना येथील तलाठी G.A. शिरसाट, ग्रामविकास अधिकारी B.B.सरोदे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भामरे, किरण बोरसे, मनिषा बोरसे, वंदना दुरडे, भालचंद्र बोरसे, घनश्याम सुरसे, नरहरी भोसले, सोनाली अहिरे, यशोदा डोळे, दिपाली मोरे, वाल्ह्याबाई कदम, सावित्रीबाई सुलाने आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, संजय अहिरे, सतिष बोरसे, सुरेश बोरसे, मधुकर सुर्यवंशी, विश्वनाथ बोरसे, एकनाथ सुर्यवंशी, बाजीराव सुलाने, रामकृष्ण बोरसे, भगवान निकम, योगेश निकम, दादा बोरसे, संजय बोरसे, शरद बोरसे, गणेश बोरसे, भावनाथ वाघ, दत्तू शेवाळे, संजय सुरसे, रविंद्र पवार, नाना बोरसे, सतिष बोरसे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments