डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन-दलीत समाजासह देशहितासाठी आजिवन संघर्ष केला व न्याय मिळवून दिला. अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना एक जगातील आदर्श राज्यघटना भारतीय नागरिकांना दिली. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि सर्वधर्म समभाव या आदर्श मूल्यांचा घटनेत समावेश केला. देशात लोकशाही, समाजवादी, संघराज्य, संसदिय शासन प्रणाली निर्माण झाल्यामुळेच नागरिकांना प्रत्यक्ष मताधिकारामुळे राजकिय व्यवस्थेत सहभागी होता आले. डाॅ. आंबेडकर यांनी भारतीय नागरिकांना दिलेली मोठी देणगी असून भारतीय संविधान हे जगात अव्वल नंबर ठरले आहे, असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले.
ते मनमाड येथे बौद्धजन उपासक संघाच्या वतीने आयोजित भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनी आयोजित व्याख्यानात बोलत होते. व्यासपीठावर बौध्दजन उपासक संघाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, आ.सुहास आण्णा कांदे, माजी आ.संजय पवार, बौध्दजन उपासक संघाचे अध्यक्ष प्रो. डॉ. जे. वाय. इंगळे, कार्याध्यक्ष अर्जुन साळवे, उपाध्यक्ष टी.एस. कांबळे, बबलु पाटील, शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख मयुर बोरसे, भाजपचे पंकज खताळ बौद्ध भिक्खू ,डी.जी.उबाळे, आणि मोठ्या संख्येने बौद्धजन उपासक बंधु भगिनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व अर्जुन साळवे यांनी बुध्दवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
या प्रसंगी आ.सुहास आण्णा कांदे यांनी मनमाड शहराच्या विकासात भरीव कार्य केले. त्याबद्दल बौद्धजन उपासक संघाच्या वतीने माजी नगराध्यक्ष मां राजाभाऊ पगारे व अध्यक्ष प्रो.डॉ.जे.वाय.इंगळे यांच्या हस्ते सन्मान-पत्र, बुके आणि शाल देऊन आ. सुहास आण्णा कांदे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी आ.सुहास कांदे म्हणाले की, दिवंगत डी.के.पगारे यांचे वंशज व उपासक संघा काही खास व उल्लेखनीय कामगिरी केल्या शिवाय कुणाचाही सत्कार करत नाही. हे मला माहीत आहे. माझ्या हातुन चांगले घडले आहे. संघाने जो सन्मान केला त्यामुळे मला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे त्यांनी सत्कार प्रसंगी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शक सौ.पुष्पाताई मतकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र कांबळे,व कृष्णा पगारे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन व सन्मान-पत्राचे वाचन व आभार बौद्धजन उपासक संघाचे अध्यक्ष प्रो.डॉ.जे.वाय.इंगळे यांनी केले.
0 Comments