Bay team aavaj marathi
मारुती जगधने पत्रकार नांदगाव {नाशिक}
मी आपणास वचन देतो की पुढच्या वर्षी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा उभा (पूर्णाकृती) पुतळा असेल त्या सोबतच बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिले गेलेल्या साहित्यांचा समावेश असलेले ग्रंथालय, तसेच पूर्णाकृती पुतळ्यासह परिसर सुशोभीकरण करण्यात येईल अशी घोषणा आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे यांनी यावेळी केली.
शनिवारी रात्री १२ वाजता नांदगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, भीमसैनिक, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
--------------------------------------------------------------------
0 Comments