दुचाकीच्या धडकेत तरस ठार तर दुचाकीस्वार जखमी

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार नांदगांव :--


नांदगांव मालेगांव रोडवरील हिंगणवाडी शिवारात दि १३ रोजी सकाळच्या दरम्यान एक दुचाकी वाहनाच्या धडकेत तरस हा वन्यप्राणी ठार झाला. याच दरम्यान दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते जखमी व्यक्तीला तत्काळ बाहेरगावी उपचारास हलविण्यात आले आसल्याचे कळते.

सविस्तर वृत्त असे की हिंगणवाडी शिवारात दि १३ रोजी सकाळच्या दरम्यान एक दुचाकी वाहनाच्या धडकेत तरस हा वन्यप्राणी ठार झाला. या अपघातातील दुचाकी स्वार देखील जखमी झाल्याने त्यास तत्काळ उपचारासाठी नेले असून तरस हा प्राणी मृत झाल्याची खबर टॅक्सीचालक भाऊसाहेब सोनवने यांनी वनविभागाला दिली त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन तरसाचे अग्नीदहन करण्यात आले. नांदगांव शहरात नागरीवस्तीत शाकंबरी नदीकिणारी उद्यामांजर नजरेत पडतात पाण्याच्या शोधात उद्यामांजर नागरी वस्तीत वास्तव्याला दिसतात. तालुक्यात बिबट्या,तरस, हरीण, कोल्हा, रान ससे, मोर लांडगे, नीलगाय आदीसह इतर वन्य पशु पक्षी जंगलात वास्तव्याला आहेत.

वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याची मागणी 

तालुक्यात सगळीकडे दुष्काळाचे चटके बसू लागल्याने शेतात तसेच मानवी वस्तीकडे सध्या पाण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करतांना आढळुन येत आहे. काळवीट कोल्हे बिबटे तरस इत्यादी वन्यप्राणी जंगलात त्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने अचानक रस्ता ओलांडताना अपघातात ठार होतात या पुर्वी देखील भटकंती करणारे हरीण अपघातात ठार झाले आहेत. तसेच अपघातात दुचाकीस्वार देखील जखमी होत असून जिवीतहानी होवू शकते तरी वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.


Post a Comment

0 Comments