Bay- team aavaj marathi
![]() |
ढेकू येथील विहिरीतून पाणी घेतांना महिला व नागरिक |
दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले असून, नांदगाव तालुक्यात दरवर्षी इतर ठिकाणच्या तुलनेत पाऊस होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याचे आ सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड शहरासाठी तब्बल ३७५ कोटींच्या निधीतून ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. मनमाड शहर गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंजत आहे. पण, येथील पाणीप्रश्ना कडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. पण, आ. सुहास कांदे यांनी करंजवण पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करुन ती मंजूर करुन त्याचे कामही सुरु केले. या योजनेतून शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे.
*आज घडीला पाणी पुरवठा योजनेसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले.*
मात्र वैयक्तिक स्वार्थापोटी पुर्व भागातील घाटमाथ्यावरील कुसूमतेल, ढेकू खु, व बुद्रुक, ढेकू तांडा, जातेगाव, वसंत नगर एक व दोन, चंदणपूरी, लोढरे, ठाकरवाडी, बोलठाण रोहिले, गोंडेगाव, जवळकी ह्या गावात दरवर्षी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वनवन विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेवून एक कर्तबगार हरहुन्नरी आमदार कांदे यांना वरील बारा गावांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वैजापूर तालुक्यातील भादली गावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्ह्याड डॅम या धरणातून मधल्या मार्गे भादली, तलवाडा ते कुसूमतेल च्या माथ्यावर अंदाजे पंधरा किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकून तेथे जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ (पाण्याची टाकी) चे बांधकाम करुन तेथून वरील सर्व गावांना बाराही महिने स्वच्छ पाणीपुरवठा पाणी पुरवठा होवू शकतो. त्याचप्रमाणे वरील पैकी जवळपास सर्वच गावांना दरवर्षी पाण्याचे टँकर किंवा पाणी पुरवठ्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्याचे काम पडणार नाही त्यामुळे शासनाचा दरवर्षी पाण्यासाठी खर्च होणारा महसूल वाचेल. व पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.
परंतु प्रत्येक गावात जलजिवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा योजना इत्यादी पाण्याच्या योजना वरील पैकी बहूतांश गावात मंजूर करून कुठलाही अनुभव नसतांना कोट्यवधी रुपयांच्या योजनांची स्वतःच्या पदरात पाडून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता किंवा एखाद्या बांधकाम सोसायटीच्या नावावर घेऊन स्वताचा दोन पैसे फायदा कसा होईल यात धन्यता मानली.
![]() |
जातेगांव वसंत नगर येथील नवीन जलजिवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरींने गाठले तळ |
0 Comments