जातेगाव येथे सामाजिक संस्थेच्या सहकार्याने तलावातून काढण्यात आला गाळ

 Bay team aavaj marathi 

मा. डॉ उज्वलकुमार चव्हाण सर (EX IRS) आयकर विभाग आयुक्त मुंबई यांच्या संकल्पनेतून मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा अंतर्गत पाण्याचे महत्व ओळखून शेतकऱ्यांसाठी जल बचतीचे कामे, नदी खोलीकरण, सटवाई बंधारा खोलीकरण, नाला खोलीकरण, बांध बंदिस्त करणे इत्यादी कामे फक्त डिझेल खर्चावर करण्यात आले. डिझेल टाका व जेसीबी मशीन वापरा (५५० रुपये तासाप्रमाणे) या तत्त्वावर जातेगाव येथे सटवाई बंधाऱ्यातून १५०० ते २००० ट्रॅक्टर ट्रिपा गाळ काढण्यात आला व जवळपास ५५ ते ६० शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. 
सटवाई तलाव बंधारा येथील गाळ काढण्याचे काम सुरू असतांना संदीप पवार बाळासाहेब लाठे राजु शेख आणि शेतकरी बांधव 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, ही सर्व कामे रोटरी क्लब ऑफ चेंबूर मुंबई यांच्यामार्फत करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक पाऊल उज्वल दादांनी उचलले आहे त्याचप्रमाणे भारतीय जैन संघटनेचे जेसीबी लवकरच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी येत आहे. त्याचप्रमाणे मा. डॉ. उज्वल दादांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी MTS परीक्षा पाचवी ते नववी वर्गासाठी राबवून त्या मुलांना पुणे येथील आझम कॅम्पस येथे मोफत राहण्याची व जेवणाची सुविधा देण्यात आली. आझम कॅम्पस पुणे येथे मुलींना प्रथम पाठविण्यात आले आहे तेथे संचालिका श्रीमती समरीन शेख ह्या स्वतः त्यांची काळजी घेतं आहे. नंतर जून जुलै ऑगस्ट दरमहा १५० मुलांना पाठवण्यात येणार आहे, त्या मुलांना तेथे संगणकाचे ज्ञान,रोबोटिक तंत्रज्ञान, लॅपटॉप,मोबाईल दुरुस्ती, कॉम्प्युटर हार्डवेअर, Spoken English, Digital skills, cyber security & crime असे अनेक विषय शिकविण्यात येत आहे.

मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम चाळीसगाव येथे श्री प्रशांत गायकवाड सर, श्री शेखर निंबाळकर सर, श्री दीपक भाऊ तेले, देवा राजपूत यांच्यासोबत जातेगाव मध्ये जेसीबीची कामे सटवाई बंधारा खोलीकरण त्याचप्रमाणे जनता माध्यमिक विद्यालय जातेगाव येथे M.T.S परीक्षा व मुलांना पुणे आझम कॅम्पसला जाण्यासाठी नियोजन झालेले आहे. तसेच या विद्यालयातील मुलांसाठी मा. डॉक्टर उज्वल दादांच्या माध्यमातून इयत्ता आठवी व नववीतील मुलांसाठी डिजिटल मचान श्रीमती प्रेमा मॅडम यांच्यामार्फत मोफत ऑनलाईन क्लास तीन वर्षासाठी घेण्यात येत आहे.

M.T.S परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र 

तसेच मिशन ५०० कोटी जलसाठा मिशनचे गाव प्रमुख व ग्राम पालिकेचे सदस्य श्री संदीप पवार, मिशनचे समन्वयक व ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे व राजू शेख आणि येथील रहिवासी माजी सैनिक चांगदेव पगारे यांनी परिश्रम घेतले.याबाबत बोलतांना संदीप पवार म्हणाले की, नांदगावचे कृषी मंडल अधिकारी श्री संकेत कराळे यांच्या मार्फत पाच पाटील टीमचे दीपक भाऊ तेले न्यायडोंगरी यांच्याकडून या विषयी माहिती मिळाली व आपल्या गावासाठी पदाधिकारी या नात्याने जनतेचे काही देणे लागतो. म्हणून अधिक खोलात जाऊन चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे जलबचतीचे कामांना प्रत्यक्ष पाहणी व भेट दिली.


 या अगोदरही दोन वर्ष मिशनचे काम चाळीसगाव तालुक्यात चालू होते, तेथील ग्रामस्थांनी वरील उपक्रम राबविल्यामुळे त्यांना बराच फायदा झाला असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.आमच्या गावात वरील उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे चाळीसगाव येथे राष्ट्रीय महाविद्यालय विद्यापीठाचे प्राचार्य जाधव साहेब, मुंबई आय.टी कंपनीचे मॅनेजर, प्रशांत गायकवाड यांची भेट घेऊन बैठकीत मुद्दा पटवून दिला. त्यांचा होकार मिळताच कामाला दि .४ एप्रिलपासून सुरुवात झाली.

आता पर्यंत येथील एकमेव असलेल्या सटवाई बंधाऱ्यातून जेसीपी यंत्रणेनेच्या सहाय्याने ४०० तासांचे काम झाले असून २००० ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या भरून गाळ काढण्यात आला आहे. व यापुढेही शेतकरी बांधवांना ना नफा ना तोटा या तत्वावर वरील योजनेअंतर्गत जेसीबी मशीन पाहिजे असेल तर उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब लाठे,राजु शेख यांनी दिली. पुढेही असाच उपक्रम राबवून गावाचा विकास, मुलांचा विकास याकडे लक्ष दिले जाईल. व मा. डॉ. उज्वल दादांच्या माध्यमातून आयटी कंपनीत शिक्षित तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामपालिका सदस्य संदीप पवार यांनी दिली.






Post a Comment

0 Comments