लोढरे येथे बिबट्याने चार महिन्याच्या वासराचा पाडला फडशा नागरिकांमध्ये घबराट

 Bay-- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील लोढरे येथील महिला शेतकरी इंदुबाई अशोक निकम वय ६० यांच्या गट नंबर ५५ मध्ये असलेल्या चार महिन्याच्या गोऱ्ह्यावर शुक्रवारी रात्रीच्या वेळेस बिबट्याने मानेच्या मागच्या बाजूला हल्ला करून त्यास बाजूला नेवून फडशा पाडला.

गोऱ्ह्याचा पंचनामा करतांना वन विभागाचे कर्मचारी व शेतकरी 

येथील शेतकऱ्यांनी बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाकडे काही दिवसांपूर्वी तक्रार केली असल्याने एक दिवस अगोदर वरील घटनास्थळा पासून १०० मिटर अंतरावर कल्याण पाटील यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्याने पिंजर्याकडे न जाता इंदुबाई निकम यांच्या शेतात असलेल्या कांदाचाळी जवळ उघड्यावर असलेल्या गोऱ्ह्यावर हल्ला चढवून त्याची शिकार केली हि घटना यांच्या घरच्यांनी सकाळी शेतात गेल्यानंतर बघीतली असता त्यांनी वनरक्षक नवनाथ बिंन्नर यांना फोन करून सांगितली. बिंन्नर या़ंनी त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सागर ढोले यांना वरील घटनेची माहिती देवून घटनास्थळी धाव घेतली व त्यांच्या आणि वनपाल दीपक वडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पाहाणी केली. 

बिबट्याच्या पावलांचे ठसे 

यावेळी आजूबाजूला बिबट्याच्या पावलांचे ठसे शेतातील मातीमध्ये उमटले असल्याचे दिसून आल्याने प्रविण निकम आणि जालिंदर आढाव या समक्ष हजर असलेल्या पंचांसमक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी नांदगाव येथील मुख्यालयात जमा केला. घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या गोऱ्ह्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उदय बागल यांनी जागेवरच करून इतर शेतकऱ्यांच्या मदतीने गोऱ्ह्यास दफन केले. 

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेला पिंजरा 

यावेळी शेतकरी बांधवांना वन विभागाच्या वतीने वनपाल दीपक वडगे व वनरक्षक नवनाथ बिंन्नर या़ंनी बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राण्यांपासून आपल्या पाळीव प्राण्यांना इजा पोहचू नये म्हणून सर्वांनी बंदिस्त गोठ्यात ठेवावे असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी वनरक्षक अमोल पवार वाहन चालक कृष्णा भिलोरे वनमजूर, विष्णू जाधव, वाल्मीक चव्हाण, दशरथ जाधव आदी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments