बायपास रस्त्या अभावी खुंटला शहराचा विकास व विस्तार

 Bay team aavaj marathi

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

मालेगाव, येवला, मनमाड,चाळीसगाव, छत्रपती संभाजी नगर या पाच शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग नांदगांव शहरातुन जात असल्याने या रस्त्यालगत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, बसस्थानक, पोलिस ठाणे, शासकीय विश्रामगृह, स्टेट बँके सह इतर बॅंका, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, तसेच येथील आ.सुहास अण्णा कांदे यांचे व इतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या रस्त्या लगतच येथील मुख्य व्यापारपेठेत येण्या जाण्याचा रस्ता दोन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वन विभागाचे कार्यालय इत्यादी ठिकाणी सर्वसामान्य जनतेस विविध कारणांमुळे/ कामांसाठी नियमित जाणे येणे असते. त्याच प्रमाणे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्याने जावे लागते.
 

परंतु वरील पाच शहरांना जोडणारा मुख्य रस्ता हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाण हुन गेला असल्याने हा रस्ता अत्यंत अरूंद असल्याने नांदगांव शहरात वारंवार रहदारी ठप्प होत असते यात आवजड वाहनांचे प्रमाण अधिक असते या वाहतूक कोंडीमुळे शहरात ध्वनी, वायु प्रदुषना सोबत अपघाताची देखील शक्यात नाकाराता येत नाही कारण आनेक वाहने नांदगांव शहरातुन जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा लावलेली असतात त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच पण त्यामुळे अपघात देखील होऊ शकतो.

सकाळी व सायंकाळी शाळेच्या वेळेत वाहतुक मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी नेहमीच झाली आहे. त्यामुळे पादचारी विद्यार्थ्यांना व जेष्ठ नागरिक, महिला यांना रस्ता ओलांडताना जिवावर बेतण्याची शक्यात आहे या पूर्वी याच मार्गावर शालेय विद्यार्थी व पादचारी यांचे अपघातात प्राण गमवावे लागले. 

त्यासाठी एक तर शहरातील रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे परंतु दोन्ही बाजूला नागरिकांच्या खाजगी इमारती दुकाने वगैरे असल्याने ते शक्य नसल्याने मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजी नगर या पाच शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग हा नांदगाव शहराच्या बाहेरून बायपास रस्त्याची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्या शिवाय नित्याची होणारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार नाही व मार्ग देखील निघणार नाही.

तीस वर्षांपूर्वी झाले होते बायपास रस्त्याचे सर्वेक्षण 

येथील १९९० च्या दशकात आपले वजन वापरून त्यावेळी नांदगाव शहराच्या बाहेरून वळन रस्ता (बायपास रस्ता) यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. हे शहराच्या चारही बाजूंनी झाले होते, आणि त्यावेळी झालेल्या सर्व्हेक्षणा प्रमाणे बायपास कदाचित रस्ते होवून शहराचा वास्तार व विकास झपाट्याने झाला असता. येथील एका बड्या हस्तीच्या काही वयक्तीक स्थावर मालमत्तेच्या मधून  नियोजित रस्ता जानार होता. हा रस्ता होवू नये यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले व रस्त्याच्या सर्वे झालेल्या नियोजित कामावर पांघरूण घालण्यास यशस्वी झाल्याने येथील बायपास रस्त्याचे काम आणि शहराचा विकास विस्तार रखडला.  

 

Post a Comment

0 Comments