नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. ग्रा.प. उपसरपंच रिक्त जागेवर शिवसेना शिंदे गटाचे योगेश भास्कर भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, त्यांचे आ. सुहास कांदे यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
सरपंच शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भालेराव यांची निवड करण्यात आली, या वेळी सरपंच पवार सदस्य सौ.सुनंदा देशमुख, रोहन फंटागळे, साहेबराव सोनवणे मंजाबाई पगारे, आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे राजेंद्र देशमुख, सुधिर देशमुख श्रावण भालेराव, प्रकाश कापसे, ज्ञानेश्वर महाराज बोगीर, ज्ञानेश्वर भालेराव, संजय पच्चन, रविंद्र देशमुख, संजय चव्हाण, मनोहर निकम, बाळासाहिब बैंडके, नारायण देशमुझ, चिंधु सदगिर व ग्रामस्य उपस्थित होते.
0 Comments