नांदगाव येथील समाज सेवक व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार मा.श्री.सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत सरकार कडे गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात सखोल चौकशी करून न्यायाची मागणी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्याचे उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नांदगाव येथील किराणा मालाचे दुकानवर मागील आठवड्यात पोलिस अधिकारी व महसूलचे अधिकारी यांनी अचानक धाड टाकली होती. त्यावेळी तेथे आठ किलो गांजा आढळून आल्याने त्यांच्यावर अमली पदार्थ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मनमाड आणि नांदगाव शहरात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला होता.
लक्षवेधी सूचना मांडतांना आ.सुहास अण्णा कांदे व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
तसेच जिल्हा पोलिस प्रमुख आणि महसूल विभागास संतोष गुप्ता यांच्यावर मनात द्वेष ठेवून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निवेदन देण्यात आले होते. व वरील घटनेची सखोल चौकशी करून खर्या गुन्हेगारास पकडून गुप्ता यांना दोषमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन आ.सुहास अण्णा कांदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून संतोष गुप्ता यांना मुक्त करण्याची मागणी केली. तसेच जिल्हा पोलिस प्रमुख आणि महसूल विभागास संतोष गुप्ता यांच्यावर मनात द्वेष ठेवून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निवेदन देण्यात आले होते. व वरील घटनेची सखोल चौकशी करून खर्या गुन्हेगारास पकडून गुप्ता यांना दोषमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन आ.सुहास अण्णा कांदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून संतोष गुप्ता यांना मुक्त करण्याची मागणी केली.
0 Comments