होरायझन अकॅडमीत राष्ट्रीय डॉक्टर डे साजरा

 Bay - team aavaj marathi 

सिताराम पिंगळे पत्रकार नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे आपल्या जीवनात डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्या साठी दरवर्षी एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि प्रख्यात चिकित्सक डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस होय.

या निमित्ताने नांदगाव येथील मविप्र संस्थेचे होरायझन
अकॅडमीत मुलांनी डॉक्टरांची वेशभूषा परिधान केली व चिमुकल्या डॉक्टरांनी विविध संदेश दिले त्यात मुलांनी भाजीपाला, डाळी,फळे,पोळीभाजी,सारखे  आहार दैनंदिन जीवनात घ्यावा.तसेच शाळेतील महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरांचे कार्य,आणि मानवाला त्यांचा होणारा उपयोग तसेच महत्त्व या विषयी नाटिका सादर केली.

या कार्यक्रमासाठी मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.अकॅडमी च्या प्राचार्या श्रीमती. पूनम.डी.मढे यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती. बिडगर,भामरे,आहेर यांनी नाटिका सादर केली.कार्यक्रम यशस्वितेसाठी अकॅडमीतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments