नांदगांव तालुक्यातील हिसवळ बु!! येथे बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरांनी३० ह रु किंमतीचे मौल्यवान दागिने चोरून नेले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माधव सोपनर रा.हिसवळ बु!! हे छत्तीसगड राज्यात CRPF म्हणून नोकरीला आहेत, त्यांच्या हिसवळ बु!! येथील बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी दि.२९ जुन रोजी कुलुप तोडून ३० ह रु किंमतीचे दागिने चोरले असा उल्लेख पोलीस तक्रारीत झाला आहे. या संर्भात CCTNS गु.र.नं.२७२/२०२४ ,४५४,४४७,३८० नुसार नोंद झाली आहे.
याबाबत यांनी माहिती देताना माझी पत्नी निर्मला माधव सोपनार हि पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली असता, तिने रोख रक्कम ८० हजार रुपये आणि दागिने चोरीला गेले आहेत, अशी फिर्यादीत सांगीतले होते. पण त्यात फक्त दागीण्याचाच उल्लेख झाला माझ्या मेहुण्याकडुन उसनवार घेतलेले ८० हजार रुपये मुलांच्या शाळेची फि भरण्यासाठी घेतले आहे. ते देखील चोरीला गेले आहे परंतु पोलिसांनी फिर्यादीत त्या पैशांचा उल्लेख केला नाही असे CRPF जवान माधव सोपनर अशी खंत व्यक्त करत सांगितले.
0 Comments