नांदगाव तालुक्यातील न्याडोंगरी येथे अपघातात मुळडोंगरी चा युवक आदेश गणपत मुकणे वय वर्षे 30 हा ठार झाला आहे तो मुळचा पांढरवड वस्ती मुळडोंगरी येथील रहिवाशी आहे. अपघाताची माहिती समजताच मुळडोंगरी येथे शोककळा पसरली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगांव ४० गांव महामार्ग क्रमांक ७५३ जे या मार्गावर न्यायडोंगरी येथील चौफुलीवर आयशरने मोटारसायकल स्वारास समोरुन धडक मारल्याने तो जागीच ठार झाला. न्यायडोंगरी चौफुलीवरून सावरगांव या मार्गाने मुळडोंगरी येथील पांढरवड वस्ती येथे आदेश हा मोटारसायकलने जात असताना समोरून चाळीसगाव येथून येणारा आयशर कंमांक G J -13 A.W/ 8002 ने मोटारसायकल कंमांक एम एच 41 A x 9373 वर स्वार आदेश गणपत मुकणे वय वर्षे 30 यास जबरदस्त धडक दिल्याने आदेश जागीच ठार झाला.
या प्रसंगी न्यायडोंगरी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, दरम्यान वाहन चालकास तत्काळ ताब्यात घेण्यात आले. मयत आदेश यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिन, दोन मुले, एक मुलगी असून पत्नी गरोदर आहे या कुटुंबातील हा करता पुरूष गेल्याने मुकने कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. या घटनेमुळे पांढरवड परिसरात शोककळा पसरली आहे. वरील घटनेचा पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे, एस. आय. प्रविण मोरे, पोलिस शिपाई अनिल जाधव हे पुढील तपास करीत आहे.
नांदगाव शहरात वाहन चालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे.
दरम्यान नांदगांव शहरातुन जानार्या महामार्गावर शाकंबरी नदी पुलावर पार्क केलेली लाहान मोठी वाहने सायंकाळच्या वेळी खाद्य पदार्थांची हातगाडे, पाणी पुडीवाला, अन्य वाहने उभी रहात असल्याने दिवसा व राञी वाहतूक कोंडी होत असते, . फुटपाथवर हि हातगाडे लागत असल्यामुळे पादार्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते अपघाताला सामोरे जावे लागते. सध्या आनेक तरुण व्यसानाच्या आहारी गेल्याने राञी किंवा दिवसा ते व्यसन करुन. बेफिकीर पणे वाहन चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तरी यावर उपाय योजनांची गरज आहे.
0 Comments