Bay- team aavaj marathi
दि .३ रोजी दुपारी जातेगाव येथील एक तरुण शेतकरी देविदास बाळू शेळके यांस कोब्रा या विषारी सर्प चावल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास नातेवाईक व गावातील नागरिकांनी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने येथील उपस्थित असलेल्या परिचारिकेने प्रथमोपचार केले.वैद्यकीय आल्यानंतर त्यांनी देविदास शेळके याची परिस्थिती बघून मालेगाव येथे उप जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे पत्र दिले.परंतु दुर्दैवाने शेळके यांस मालेगाव येथे नेत असताना रस्त्यात जाता जाता वेळेत उपचार न झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.
नांदगावचे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर वेळेत व योग्य केल्या जात न करता उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप करत तालुक्यातील सर्पदंश असो किंवा प्रसुतीसाठी आलेल्या महिला किंवा इतर आजारांचे सर्व रुग्णांवर इलाज करण्याची कष्ट न घेता, कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याचे कारण दाखवून त्यांना त्यांना सरळ मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जात असल्याने आज गुरुवार दि.४ जोपर्यंत ही icu रूम तालुक्यातील सर्वसामान्य जनतेस खुली होत नाही. तोपर्यंत या icu रुमच्या छतावर बसून बेमुदत अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले होते. परंतु आंदोलन करण्यासाठी सुर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते गेले असता,उपस्थित वैद्यकीय अधिकारी काजल साळुंखे (तुसे) यांनी आरोग्य विभागाकडे येथे मंजूर असलेल्या अ वर्ग वैद्यकीय अधिकारी दोन आणि इतर १२ कर्मचारी संख्या आणि इतर कमी असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी १४ऑगष्ट २०२३ रोजी व १९ जुन २४ रोजी पत्र पाठविले असल्याचे सांगितले. त्यामुळे १० जुलै पर्यंत पुकारण्यात आलेले आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असून, त्यानंतर नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध झाली नाही तर आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रहारचे अध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी सांगितले.
उपचाराअभावी मृत्यूमुखी पडलेले देविदास शेळके

0 Comments