गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला दिले जीवदान

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/ सर्पमिञ प्रभाकर निकुंभ यांनी जीवदान दिले. तालुक्यातील नांदगाव शहरालगत मौजे गंगाधरी येथील शेतकरी मोहन विठ्ठल इघे..यांचे गट क्रमांक 65/2 यांच्या शेतातील विहिरीमध्ये उद मांजर पडले होते. दि. 3 रोजी विहिरीत पडलेल्या उदमांजरास सुरक्षित रेस्क्यू केले.

 या बाबत सविस्तर वृत्त असे की,नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव तालुका अध्यक्ष वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र प्रभाकर निकुंभ विभागाचे अधिकारी सुनील महाले, वनरक्षक अमोल पवार, संजय बेडवाल, पाटील तसेच शेतकरी ज्ञानेश्वर अण्णा इघे,भरत मोहन इघे, संयोग रमेश साळुंखे, राजू सोनज इत्यादी शेतकऱ्यांनी यांच्या मदतीने उद मांजरास जीवदान देण्यात यश आले आहे..एक वन्य जीव वाचवल्याबद्दल परिसरात सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. 

दरम्यान या प्रसंगी सर्पमिञ निकुंभ यांनी जीव धोक्यात घालुन दोर शिडीच्या मदतीने ७० फुट खोल विहिरीत उतरूण उदमांजराला पकडून जीवदान देत अधिवासत सोडले. सध्या नांदगांव शहरात खांदेशीवाडा,नांवंदर दवाखाना,के मार्ट आदी ठिकाणी उदमांजर आढळतात त्यामुळे मुले व महिला उदमांजराच्या दहशतीत वावरतात.

Post a Comment

0 Comments