मनमाड पोलिसांची कामगिरी चोरीच्या २३ दुचाकी जप्त तिघेजन अटकेत

Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

मनमाड ता.नांदगांव पोलिसांनी केलेल्या कामगिरीत चोरीच्या २३ दुचाकी जप्त करुन तिघा चोरांना जेरबंद करण्यात आले. मनमाड आणि पंचक्रोशीत मागील काही महिण्यापासुन मोटार सायकल चोरीचे होत असल्याच्या तक्रारी पोलिसात होत असे. हाच धागा पकडून मनमाड पोलिसांनी मोटार सायकल चोरीवर लक्ष केंद्रीत करून त्या अनुषंगाने तपास चक्र फिरवले व  चोरीच्या तब्बल २३ मोटार सायकल हस्तगत करण्यात मनमाड पोलिसांना यश आले.

मनमाड शहरात आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या लक्षात आले त्या द्रुष्टीने दुचाकी चोरीच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मनमाड पोलिसांना याबाबत सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या टिप वरुन माहितीच्या आधारे आकाश राऊत त्यांचे इतर ३ साथीदारांना चोरीची दुचाकी विकताना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल 23 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मनमाड शहर,नांदगाव चांदवड,येवला,लासलगांव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.याबाबत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपास मोहीम राबवण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबविली. यात अनेक ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. शहरातील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, यातच पोलिसांना सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे १) आकाश सुभाष राऊत रा.विवेकानंद नगर,मनमाड, भाबडवस्ती, डोणगांव रोड,मनमाड येथे चोरीची मोटर सायकल विक्री करण्यासाठी येत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली डी. पी. पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ व त्यांचे पथक असे सदर ठिकाणी सापळा लावून थांबले असता आरोपी याने त्याचे ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन आला असता त्याचे सोबत दुसऱ्या मोटरसायकलवर असलेले त्याचे साथीदार २) सद्गुरु शांतिगिरी गोसावी, डोणगांव रोड, मनमाड ३) समाधान काळे रा.बेजगांव, मनमाड ४) आकाश निकम रा.नांदगाव असे यांचे नाव सांगून जिल्ह्यामधून विविध ठिकाणी 23 मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून 23 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे. 

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 223 ऑब्लिक 2024 BNS 379 प्रमाणे दि. 1/7/2024 रोजी गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्ह्यात हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची एम एच 41 बी जे 05 09 मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून चोरून नेली होती. ती जप्त करण्यात आली आहे, या घटनेचा अधिक तपास मनमाड पोलीस घेत आहे.




Post a Comment

0 Comments