हमी भाव मिळावा यासाठी अन्नत्याग आंदोलन

 Bay - team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार (नांदगाव)

कांदा उत्पादकांना कांद्याला हमी भाव मिळावा या मागणी साठी चांदवड येथे आंदोलन करण्यात आले, त्या आंदोलनाचे रूपांतर आता डाॅ. शाम पगार यांनी दि .१ पासून आन्न त्याग आंदोलनात केले असून आंदोलनाचा दि ४ रोजी ४ था दिवस होता तरी देखील या शेतकरी आंदोलनाची शासन प्रशासन आदी पैकी कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे अंदोलना संदर्भात शेतकर्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या चांदवड येथील विश्राम ग्रहाजवळ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कृषीदिना पासून हे आंदोलन सुरु आहे .केंद्राचे निर्यात बंदीचे धोरण ,हमीभाव मिळावा यासह प्रमुख मागण्या आंदोलन प्रसंगी करण्यात आल्या आहे .या आंदोलनास डाॅ शाम पगार यांनी आन्नात्याग आदोंलन सुरु केले आहे. या दरम्यान आंदोलन सस्थळावरुन बागायतदार संतोश जाधव यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. व आदोलकांनी मागण्या जोरदारपणे मांडल्या

Post a Comment

0 Comments