Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक
तालुक्यातील लोढरे शिवारात मादी जातीच्या बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने त्याच्या दहशतीने भयभित झाले असुन या परिसरात मादी जातीचे बिबट आणि त्याचे बछडे असल्याचा संशय वनविभाने वर्तविला असून त्याच पकडण्या साठी पिंजरा लावण्यात आला आहे. व त्याबाबत जनजागृती करुन सावधानता बाळगणे बाबत सूचना दिल्या आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, घाटमाथ्यावर कुसूमतेल पासून ते लोढरा या गावांच्या उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील कपिलनाथ मोठा महादेव कन्नड तालुक्यातील पित्तळ खोरे चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी डोंगर आहे. पैकी जातेगांव च्या उत्तरेस जळगाव नाशिक छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याची हद्द असून वन विभागाचा हा मोठा परिसर आहे.
मागील वर्षी या परिसरात अत्यंत कमी पाऊस झाल्याने आणि या वर्षी देखील पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला परंतु अद्याप दमदार पाऊस झाला नाही त्यामुळे वन्यप्राण्यांना जंगलात पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (पाणवठे) नसल्याने लोढरे जातेगांव, ढेकू इत्यादी गावांतील शेतकऱ्यांची शेतजमीन वन विभागाच्या लगत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या शोधात बिबट्या,तरस, नीलगाय, हरीण, लांडगे, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे. बर्याच वेळा शेतकरी बांधवांचे बैल गाय म्हैस कुत्रे शेळ्या मेंढ्या कोंबड्या इत्यादी पाळीव प्राण्यांना बिबट,तरस इत्यादी हिंस्र प्राणी आपले भक्ष बनविण्या साठी वावरताना आढळतात. त्यांच्या पासून मनुष्य जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी बांधवांना शेतात काम करण्यासाठी मजुर देखील मिळत नसल्याने शेतीची मशागत करणे अवघड झाले आहे.
बिबट्याच्या दहशतीने नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असता वनविभागाचे तालुका परिक्षेञ अधिकारी एस. एस. ढोले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल बिन्नर यांनी मौजे लोंढरे येथे अमोल सुभाष निकम यांचे गट नंबर 34/2 मध्ये प्रत्यक्ष पाहाणी केली असता, त्यांना बिबट्या या वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसल्याने तेथे परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावून ग्रामस्थाना व शेतकऱ्यांना बिबट्या संरक्षणाबाबत जनजागृती केली.परंतु पाच दिवसात बिबट्या पिंजर्यात आला नाही.
त्यामुळे नागरिकांची धाकधुक वाढली आहे.त्याचप्रमाणे नीलगाय हरिण रानडुक्कर इत्यादी प्राण्यांपासून शेती पिकांना देखील मोठे नुकसान होत आहे. त्यांचा देखील वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकरी बांधव करत आहे. त्याच बरोबर तालुक्यातील चिंचविहीर परिसरात देखील बिबट्या दिसला असल्याचे स्थानिक नागरीक सांगतात, तरी ठिकाणाची खाञी करुन वनविभागाने नागरिकांशी बिबट्याचा वावर असल्यायास जनजागृती करावी.
0 Comments