बोलठाण उप बाजार समिती आवारातील काम सुरू असलेले शेड कोसळले

 Bay -team aavaj marathi 

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोलठाण उपबाजार येथे यार्ड खडीकरण, दर्शनी भागात वॉल कंपाऊंड, प्रवेशद्वार, हायमास्ट दिवे, धान्य शेड लिलाव ही विकास कामे सुरू आहेत. हे सर्व विकास कामे बाजार समितीच्या निधीतून सुरू आहेत. सुमारे 38 लाख किंमत असलेले धान्य लिलावासाठी लोखंडी पत्रा शेड उभारण्याचे काम सुरू असून शुक्रवारी दि. 5 रोजी सायंकाळच्या सुमारास शेड च्या लोखंडी कैच्यांचा सांगाडा काम सुरू असतांना ठेकेदार व कारागीर यांच्या निष्काळजीपणा मुळे कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नसली तरी कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे उभारणी होणे आगोदरच हा सांगाडा कोसळल्याने घाटमाथ्यावर चर्चेला उधाण आले आहे.
बोलठाण उप बाजार समिती आवारातील   कोसळलेले शेड


कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांची प्रतिक्रिया

बोलठाण उप बाजार समितीचे आवारात धान्य लिलाव शेडचे काम नांदगांव येथील भैरवनाथ कन्स्ट्रक्शन या ठेकेदारा मार्फत सुरू असून शेडचा लोखंडी सांगाडा काल कोसळला. तरी याबाबत आज प्रत्यक्ष पाहणी करून कामावर नेमणूक केलेले आर्किटेक्ट यांना तात्काळ याबाबत कळवून हा सांगाडा का कोसळला याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे बाबत सुचित केलेले आहे. अहवाल प्राप्त झाले नंतर यात नेमका काय दोष झाला याबाबत दखल घेवून पुढील योग्य कार्यवाही करणेत येईल. सुरू असलेल्या या शेडच्या कामासाठी अद्याप वरील ठेकेदारास कुठल्याही प्रकारची रक्कम देयक अदा करण्यात आली नाही किंवा त्याबाबत चर्चा झाली नाही 
- श्री. अमोल खैरनार , सचिव

Post a Comment

0 Comments