विसपुते यांची माहिती अधिकार पदावर निवड

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

माहिती अधिकार महासंघाच्या कार्यकर्ता फेडरेशनच्या नांदगांव तालुका सह प्रचारकपदी अशोक विसपुते रा.जामदरी ता. नांदगांव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पञ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वसवेकर यांचे लेखी नियुक्ती पञ विसपुते यांना प्राप्त झाले आहे.

प्राप्त पञात म्हटले की आपणास दिलेले पद हे मानद स्वरूपाचे आहे. आपणास भारतीय संविधान ,भारतीय कायदे,व आपले माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन ची आचरसहिता याचे काटकोर पालन करावयाचे आहे. आपणास पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सर्व सामण्या नागरीकामध्ये समाजामध्ये माहिती अधिकाराचा प्रचार प्रसार करावा अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

विसपुते यांच्या निवडीचे पद नांदगांव तालुक्याला प्रथमच प्राप्त झाले विसपुते यांनी पोस्ट खात्यात आपल्या नावाचा ठसा उमटविला असून कार्य तत्पर असणारे विसपुते यांचे निवडीचे विविध नामवंतानी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments