"कासलीवाल स्कूलमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा"

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

दिनांक 18 जून 2024 नांदगाव, येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'फादर्स डे' अर्थात पितृ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्कूलचे प्राचार्य श्री मनी चावला सर यांनी भूषविले. 

या कार्यक्रम प्रसंगी युकेजीच्या चैतन्य दाभाडे, साई पवार, श्लोक फोफलिया या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. तसेच याप्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी 'पापा मेरी जान' या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. 

यावेळी पालकांसाठी बिल्डिंग टाॅवर, रनिंग रेस, बलून गेम्स इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला आपल्या वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

तसेच वडिलांनी आपल्या मुलांबरोबर डान्स करत कार्यक्रमाची शोभा वाढवली, वेगवेगळ्या खेळांमध्ये विजयी झालेल्या पालकांना संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार कासलीवाल यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आला. सर्व उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सचिव विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलकुमार कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्रभाऊ चांदिवाल, प्रशासक पी.पी गुप्ता तसेच स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी फादर डे च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री मणी चावला सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments