महाराष्ट्र वीरशैव सभा प्रदेश कार्यकारिणी कडुन गेली दोन वर्षा पासुन झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविला जात आहे, आणी आता अकोला जिल्हा समीती मेळावा आयोजित करत आहे तसेच एक झाड लावुन फोटो पाठवा हा उपक्रम राबविला जात आहे उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे.
त्या निमीत्त हा उपक्रम महिला करीता आहे, शुक्रवारी दि. २१ रोजी वट पौर्णिमा आहे., पूजा करण्यासाठी वडाची फांदी तोडून न आणता, एक लहानसं वटवृक्षाचे रोप कोणत्याही नर्सरी मधून विकत घेऊन या, ते एका कुंडीमध्ये लावा पूजा करून ते रोप घरीच सांभाळा आणि २/३ वर्षांनी जमिनीत शेतात, घराच्या बाजुला रस्त्याच्या कडेने बागेत वा इतरत्र कोठेही लावा हा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्रुपमध्ये असणाऱ्या माता-भगिनी व महिला जिल्हा समीतीच्या माध्यमातून समाजातील सर्वांपर्यंत पोहोचवा.
तसेच प्रत्येक महिला समीतीने जिल्हा समीती कडे शेअर करावा,असे आवाहन श्री महेशआप्पा शेटे प्रदेश उपाध्यक्ष- झाडे लावा झाडे जगवा समीती अकोला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments