नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन ॲकॅडमी नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी ग्रीन- डे उत्साहात साजरा केला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे पोशाख परिधान करून झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा देश वाचवा असे विविध संदेश देणारे पोशाख परिधान करून सामाजिक संदेश दिला.
झाडांची पाने, झाडांच्या आकाराची कलाकृती, झाडांची रोपटे आदी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत आणले होते पर्यावरण संतुलित राहावे यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे असाही संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी हरित भारत, पृथ्वीमाता असे अनेक पोस्टर बनवले होते, आपल्या मनपसंतीच्या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि हिरवी खाद्यपदार्थ आदी व्यंजनांचा आस्वाद घेतला. व वृक्ष,पक्षी, पृथ्वी यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व चिमुकल्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या श्रीमती.पी.डी.मढे, अकॅडमीचे शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments