नांदगावच्या या विद्यालयाने १६ वर्षांची परंपरा राखत तयार केल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव येथील वैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालयाने   १६ वर्षापासून शाडुमातीचे पर्यावरण पुरक गणेश मुर्ती  उपक्रम राबविला कार्यशाळेत एकाचे वेळी साकारल्या २५७ गणेश मूर्ती 
तयार केल्या.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित आयोजित  येथील बैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालय  या शाळेत शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा  संपन्न झाली.या विद्यालयात गेल्या सलग १६ वर्षांपासून शाडूमातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्याथ्यांना मुले,मुली यांना दिले जात आहे. कलेच्या माध्यमातून पर्यावरण पुरक उत्सव साजरा करण्याच्या मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच मुलांच्या सुप्त कला- गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यालयात दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी या कार्यशाळेत २५७ विद्यार्थी सहभागी झाले.

या कार्यशाळेचे उद्घाटन पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संदिप जेजुरकर मुख्याध्यापक  लक्ष्मीकांत ठाकरे,उप मुख्याध्यापक खंडू खालकर पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव, टी.एम.भास्कर मधे ,चंद्रकांत दाभाडे उपस्थित होते.  मान्यवरांच्या  हस्ते  गणेशाच्या मूर्तीचे व शाडू मातीचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी संस्थेने या चालविलेल्या उपक्रम राज्यातील इतर संस्था व शाळेंनी हाती घेतला आहे असे सांगून त्यांनी शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.तसेच  विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली गणेश उत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असे. प्रमुख पाहुणे जेजुरकर यांनी आपल्या भाषणात म्हटले या कार्यशाळेचे कौतुक करून विद्यार्थी चांगली गणेश मूर्ती तयार करेल त्याला ५०१ रुपयाचे पारितोषिक जाहीर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव यांनी केले. 

कार्यशाळा प्रमुख कलाशिक्षक विजय चव्हाण ,चंद्रकात दाभाडे, ज्ञानेश्वर डंबाळे शशिकांत खांडवी यांनी ग्रुप करून शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्षिक दाखवून गणेश मूर्ती तयार करून दाखविल्या. माती मळण्यापासून तर गणपतीचे सर्व भाग कशा पद्धतीने बनवायचे याचे बारकावे हि सांगण्यात आले यानंतर संपुर्ण दिवसभर कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या व विविध भावमुद्रा असलेल्या आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत विद्यार्थांनी विविध भावामुद्रेच्या एकूण २५७ गणेश मूर्ती साकारल्या. बनविलेल्या मूर्ती सुकल्यावर विद्यार्थांना रंगकाम कसे करायचे याची माहिती देऊन रंगकाम करून घेणार आहेत विद्यार्थी तयार झालेल्या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करणार आहेत .

Post a Comment

0 Comments