दगडावर घोडा करुन बसा टाका मारा आणी त्या दगडाला आकार द्या शेंदुर लावलेले देवपण हे काळापुत असते. परंतु घडलेले देवत्व ञिकाल आबादीत असते. मानवाची वृत्ती मानवी असावी परंतु सध्या प्रत्येक मनुष्याच्या मनात क्रोध आणी विकार वाढले आहे. असे प्रतिपादन विंचूर येथील कार्यक्रमात हभप- भालेरांव महाराज यांनी केले.
विंचवाची नांगी काढा त्यात साधुत्व आले समजा, घात करण्याची प्रवृत्ती नष्ट करा. भगवत प्राप्ती पक्षे विटंबना जास्त वाढली देवदेवता राहिला नाही. देवाचा व्यापार बनला पाखंडीचे प्रमाण वाढले संन्याशी भोग घेऊ लागले. सन्याशी हुन संसारी बरे. साधु संपती जोडतो आणी शिष्य वाटेकरी बनतात मग संसारी व साधू यातील फरक काय? अशी प्रखर खंत ह भ प भागवताचार्य सागर भालेराव महाराज यांनी व्यक्त केले. सत्कर्म म्हणजे ज्या कर्मातुन गरजवंताची गरज भागते त्याला सतकर्म म्हणतात सप्ताहातील किर्तनकाराना पाकीट देऊन ते होत आहे महाराजांनी आता लोकापुढे झोळ्याच धरल्या जनतेला लुटण्याची अशी प्रखर टीका भालेराव महाराजांनी केले.
विंचुर येथील संजय जाधव यांच्या पुण्यस्मराणा निमित्त आयोजीत प्रवचनरुपी देवरे प्रसंगी ते पुष्प गुंफित होते .या प्रसंगी विंचुर येथील धार्मीक कार्यात ते बोलत होते या प्रसंगी ग्रंथ राज ज्ञानेश्वरीतील पसायदान ८ वा अध्याय निवडण्यात आला. संत वांडमय हे जीवनाचे सार्थक सागर आहे.सर्व काही पिंडदान करताना अंगावर सोहळाअसावा, स्वैराचारी जीवन झाले नियम पाळण्यासाठी असते ब्राम्हण सोहळ्यात असावा मंञोपचारा शुध्द असावे व्याकरण शुध्द असावे अन्यथा पतन होते. भटजींची नियमितसंध्या असावी ९ कर्माचे आचरण भाटजीचे असावे दशक्रिया व श्राध्द हे कर्मकांड आहेत.
त्यासाठी रामकृष्णनांम असावे मृत्यु हा बलवान आहे.देवाचे आवतार ही गेले.नवनारायन गेले. म्हणून देह त्यागायचा आहे .मृत्युकडे कुणाचे लक्ष नाही. परमार्थाला लागून हित असते संतानी लिहिलेले ग्रंथ आजुन कुणी वाचले नाही. धर्मप्रवर्तानी धर्म भ्रष्ट केले धर्म रसातळाला गेला, तुम्ही केलेले कर्म स्वैराची झाले आहे.कथाकिर्तन लोकांना पटत नाही परमार्थीक अनुभव मांडावे कीर्तनात संसाराच्या गप्फा मारतात. संताची द्रुष्टी हि आईची द्रुष्टी आसते .लेकुराचे हित जाने माउलीचे चित्त हित आणी उध्दार करणारे होऊन गेले देव आणी संत आहेत .औदार्य जानु घ्या असे प्रकट मत ह भ प सागर भालेराव सायगांव यांनी व्यक्त केले.
0 Comments