जिल्हा परिषद शाळेत रक्षाबंधन व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोज मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुम तेल तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे अवचित्य साधून गोपाळकाल्याचे निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांमधूनच श्रीकृष्ण व राधा यांचे प्रतीकात्मक निर्विकार रूप साकार करण्यात आल
त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व व त्याचे संवर्धन याची बांधिलकी जपण्यासाठी वृक्ष रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
येथील शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष श्री कैलास कोळपे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मनोरंजनात्मक तसेच इतर कार्यक्रमाचा लाभ तथा आस्वाद घेता यावा यासाठी शाळेला चाळीस इंची कलर एलईडी टीव्ही भेट दिला विद्यार्थ्यांना स्नेह भोजनामध्ये सोयाबीन मसाले भात व बासुंदीचा आस्वाद घेता आला.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती कुसुम तेल येथील माजी अध्यक्ष कैलास भाऊ कोळपे व आजी अध्यक्ष संजय भाऊ जगताप तसेच सर्व सदस्य उपस्थित होते .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी ;ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला
0 Comments