Bay- team aavaj marathi
दि.२६.. नाशिक जिल्ह्यातील श्री क्षैत्र त्र्यबकेश्वर नंतर पवित्र श्रावण महिन्यात शिव मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी असणारे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामदैवत व मराठवाडा मध्यमहाराष्ट्र आणी खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षैत्र पिणाकेश्वर महादेवास सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळ पासुन अबालवृद्धासह भाविकांनी हरहर महादेव, पिणाकेश्वर महादेव की जय या उद्घोषणा देत दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पावसाने हजेरी लावल्याने आलेल्या भाविकांना दर्शन करून परतण्याची ओढ लागल्याने दुपारनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
श्रावण महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ठिकठिकाणच्या दररोज सुमारे पन्नास पेक्षा अधिक शेकडो भाविकांच्या दिंड्या येथे आल्या त्यांच्या मुक्काम व्यवस्था मंदिर परीसरातील शेडमध्ये करण्यात आली होती येणार्या भाविकांनी विश्रांती करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर प्रसाद खेळणी बेन्टेक्स ज्वेलरी फोटो मिठाई दुकाने ठेवण्यात आली असल्याने येनार्या भाविकांना थांबण्यासाठी बर्यापैकी जागा उपलब्ध झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
श्रावन महिण्यातील चौथा सोमवार असल्याणे ज्यांना गर्दीमुळे आगोदर येता आले नाही त्या भाविकांनी मिळेल त्या वाहनाने येवून सायंकाळी उशिरापर्यंत दर्शन घेतले. या सोमवारी साधारण ३५ ते ४० हजार भाविक दर्शनासाठी आले असल्याचा अंदाज विश्वस्थ मंडळाने व्यक्त केला. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच महिला व पुरुष पोलिस पोलिस कर्मचारी होमगार्ड व झिरो पोलिस कर्मचारी, स्वयंसेवकांनी भाविकांना दर्शनासाठी आणी वहातुक सुरळीत केली.

0 Comments