आ. सुहास कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम कांदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आ.सुहास अण्णा यांच्या विशेष प्रयत्नातून नांदगाव शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इदगाह व शादीखाना चे उदघाट्न सौ.अंजुम सुहास कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
त्यावेळी आ श्री.कांदे म्हणाले की, जी मुस्लिम कुटुंबं गरीब आहेत, त्यांच्या ही मुलामुलींची लॉन्स मध्ये लग्न करण्याची इच्छा असतेच ना, म्हणून हा शादीखाना उभारून दिलाय. आता या आलिशान शादीखाना मध्ये गरीब मुस्लिम बांधवांच्या मुलामुलींची लग्ने आता फक्त १०१ रुपयात लावली जातील. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे प्रतिपादन आ. सुहास कांदे यांनी केले.अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सौ.अंजुम कांदे,फरहान खान, इकबाल शेख, शाईनाथ गिडगे, अल्ताफबाबा खान, मयूर बोरसे, सुनील हांडगे, महेंद्र शिरसाठ, सौ.उज्वला खाडे, रोहिणी मोरे, सुजाता कातकडे, ज्ञानेश्वर कांदे, बबलू पाटील,अमजद पठाण,जाफर मिर्झा,असिफ पठाण, रफिक पठाण, हाजी मुनावर,आदीसह जेष्ठ मुस्लिम बांधव उपस्थित होते.आ.श्री.कांदे पुढे म्हणाले की, सौ. अंजुम च्या वाढदिवस निमित्त या शादी खाना साठी सुमारे ६० लाख रुपयांची स्वयंपाकासाठी भांडी,टेबल, खुर्च्या दिल्या आहेत. आणि या भांड्यांसाठी कुठलेही भाडे आकारले जाणार नाही.
याउलट दरवर्षी १० गरीब लोकांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च मी स्वतः करेन. ह्या शादी खाना च्या दुमजली इमारतीचा प्रस्ताव ही मंजूर झाला असून, येत्या आठ दिवसात ते काम व येथे पेव्हर ब्लॉक, संपूर्ण संरक्षक कंपाउंड ही बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मतदार संघातील सर्व हिंदू बांधव व मुस्लिम बांधव एकोप्याने राहत आहेत. त्यांच्यात धर्मावरून कधीच वाद मी होऊ देणार नाही. व दोघांपैकी कुणावर ही अन्याय होणार नाही. याची सतत काळजी मी घेईन. तसेच मतदार संघातील ज्या ज्या गावात मुस्लिम बहुल वस्ती आहे, त्या प्रत्येक ठिकाणी शादी खाना व ईदगाह बांधून दिले आहेत. असे ही आ. कांदे शेवटी म्हणाले. तर सौ. कांदे म्हणाल्या की,माझे आजोबा नांदगाव मध्ये अनेक वर्षे वास्तव्य करून होते.येथील मुस्लिम बांधवांच्या समस्याकडे आज पर्यंत कुणीच लक्ष दिले नाही. मात्र आपले आमदार जात पात, धर्म भेद मानत नाही. म्हणून सर्वच जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन विकासकामे करत आहेत. यावेळी हाजी मुनावर,अँड.युनूस शेख,अय्याज शेख, शबाना शेख, बब्बू शेख, रियाज पठाण,आदीनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमोद भाबड,सागर हिरे, सुनील जाधव, बापू जाधव,आदीसह आ. सुहास अण्णा कांदे रहेनुमा फाउंडेशन चे अध्यक्ष सईद हाजी, सचिव अय्याज शेख,कार्याध्यक्ष रियाज पठाण, सदस्य वसीम खान, नईम शेख, इकबाल शेख, समन्वय समिती सदस्य हाजी मुनव्वर पठाण,हाजी जहीर,इकबाल दादा शेख,ॲड युनूस शेख, लतिफ सुफर,चिराग सेठ, खलील जनाब आदी सह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
0 Comments