Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)
मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्रालयाने निर्देशित केलेल्या "सखी सावित्री" समितीच्या वतीने दि.२४ ऑगस्ट रोजी शाळेतील सर्व शिक्षकांसाठी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. पुनम मढे तसेच वैद्यकीय सल्लागार डॉ रुपाली पाटील, सौ. छाया देवरे व प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू उपस्थित होते.
सखी सावित्री समितीच्या कार्यक्रम अधिकारी सौ. उर्मिला तुरकणे यांनी सुत्रसंचलन केले. शाळेचे शिक्षक श्री भाऊसाहेब दाभाडे यांनी प्रास्ताविक सादर केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी याप्रसंगी शाळेत मुलांच्या अडीअडचणींना सर्वतोपरी प्राधान्य देण्यात येईल तसेच मुलीनां व पालकांना जागरुकता अभियान राबविण्यात येईल. समितीच्या समुदेशक सौ. सुप्रिया कर्णे यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी सखी सावित्री समितीच्या सदस्य सौ. सीमा गरुड, विद्यार्थीनी प्रतिनिधि कु. वेदिका सगळे, कु. आराध्या बच्छाव व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments