गुड शेफर्ड स्कुलमध्ये विशाखा समितीचे चारित्रसपंन्न शिबीर संपन्न.

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

मनमाड येथील गुड शेफर्ड स्कुलमध्ये इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या  शारिरीक व मानसिक विकासासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अलिकडच्या काळात शाळेतील मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसुन येत आहे, यापाठीमागे समाजाची बदलेली मानसिकता आहे. यात बदल होणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन याप्रसंगी नांदगावच्या प्रसिद्द कायदेतज्ज्ञ मा. विद्या कसबे यांनी केले.

यावेळी मंचावर उपस्थित विशाखा समितीच्या वैद्यकीय सल्लागार डॉ. स्वाती देवरे व नांदगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. अमोल खरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.शाळेच्या वतीने विशाखा समितीची विद्यार्थी प्रतिनिधि कु. अलमिरा सोनावाला हिच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वच मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वयात येणाऱ्या मुलांच्या होणार्या शारिरीक बदला बद्दल या शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. 

विद्यार्थ्याना महीला व मुलींची सुरक्षा करण्याची जबाबदारी आमची आहे अशी शपथ याप्रसंगी देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता शाळेचे प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. चंद्रप्रभा जाधव यांनी केले. प्रास्तविक विशाखा समितीच्या अध्यक्षा सौ. सोफिया राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. अमिता शुक्ला यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments