Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगांव तालुक्यातील तापी खोर्यातील जलदगतीने पाणी साठवण होणारे सुमारे ५०० द. ल. घ.फुट एवढी क्षमता असलेले माणीकपुंज धरण काठोकाठ भरण्यास दोन फूट बाकी कमी.
तालुक्यातील शेतीला सिंचनाची संजीवनी ठरलेल्या माणीकपुंज धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त दोन फूट बाकी राहिले असून, येत्या काही तासात धरणाच्या सांडव्यातुन पाणी बाहेर पडेल अशी शक्यता आहे. मण्याड नदीवर माणीकपुंज किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेल्या या धरणात पाणी साठा वाढत असून धरण जवळपास भरल्यात जमा आहे.
धरण भरल्यास वाया जानारे पुरपाणी कालव्यातून सोडण्यात येण्याची शक्यता असून हे पाणी कालव्यातून सोडल्यास धरणाच्या लाभ क्षेञातील सुमारे १५ गावांना या पुरपाण्याचा लाभ मिळतो. या पाट कालव्याच्या पाण्यातून लाभ क्षेञातील गावांची बांध-बंधारे भरुन त्याचा लाभ शेतकर्याना व गावांना होईल तसेच धरणावरील शेकडो कृषीपंपाना उचलपाणी घेता यईल .
0 Comments