मैत्री सोशल ग्रुप तर्फे शालेय साहित्यांचे वाटप

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये  सन १९८२ शिक्षण घेत असलेल्या मैत्री सोशल ग्रुप तर्फे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय दफ्तर, शूज,वृक्षरोपनसाठी दहा जाळ्या आदी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नहार शाळेचे माजी शिक्षक प्रा.नंद, प्रकाश थोरात,पवन रायबाकर, दिलीप इप्पर आदी मंचावर उपस्थित होते. व्ही.जे. हायस्कूल नांदगाव शाळेची सन 1982 ची माजी विद्यार्थ्यांच्या सोशल मैत्री ग्रुप तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यातून गोरगरीब, कष्टकरी व शेतकरी नागरिकांना विविध गरजेच्या साहित्यांचे वाटप या बॅच तर्फे नेहमी केले जाते. 

त्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा होत असतो त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये या योजनांचा उपयोग होतो. यावेळी श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज बोलठाण या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे माजी शिक्षक प्राध्यापक नंद यांनी मानवाच्या जीवनामध्ये शिक्षणाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments