Bay -team aavaj marathi
संतोष कांदे पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरातील माझ्या भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून सद्यस्थितीत ११० कंपन्या आमच्याशी संर्पक साधून आहेत. मात्र आम्ही ५०० कंपन्याना जोडून घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जेणेकरून उद्दिष्ट शक्य होईल,असे प्रतिपादन आ. सुहास अण्णा कांदे यांनी केले.
नांदगाव येथील आ. कांदे बंगल्यावर मतदार संघातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भव्य स्वयं रोजगार निर्मिती, प्रदर्शन व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आ. श्री.कांदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर या उपक्रमाच्या प्रणेत्या समाजसेविका सौ.अंजुम कांदे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्या जगताप, मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, तालुका अधिकारी डॉ. संतोष जगताप, राजेंद्र पवार, अश्विनी जाधव, लीना पाटील,रोहिणी मोरे, संगीता बागुल, राहुल कुटे, राजेंद्र भाबड, दत्तू निकम, अनिल रिंढे, दीपक मोरे आदी उपस्थित होते.
तसेच ज्या कंपन्या आपल्याशी जोडल्या जाणार आहेत, त्यांच्याशी आपण पाच वर्षाचा करार करणार असून, दरवर्षी जशी कच्चा मालात वाढ होईल. त्याचप्रमाणे जो पक्का माल तुम्ही तयार कराल त्याच्या रकमेत ही वाढ करण्याची अट या करारात असेल.असे स्पष्ट करून आ श्री. कांदे पुढे म्हणाले की, इतकेच नाही तर कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी जी मिशनरी लागणार आहे, ती घेण्यासाठी १०० टक्के कर्जपुरवठा आम्ही करणार आहोत. तुमचे सिबिल कमी असो वा जास्त कर्ज घेण्यास कुठलंही अडचण येणार नाही. आणि कच्चा माल घेण्यासाठी ठेव द्यावी लागते. पण तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण ते सर्व पैसे सौ. अंजुम कांदे ह्या देतील.आलेल्या उत्पनातून याची परतफेड तुम्हाला करावी लागेल.आणि मी खात्रीने सांगतो की, फक्त तीन वर्षात ह्या मशीनची पूर्ण रक्कम फेड कराल त्यानंतर मशीन तुमच्या मालकीचे होईल. उत्कृष्ट उत्पादन व उत्पन्न घेणाऱ्या बचत गटाना पुरस्कार देण्यात येतील. असे आ. कांदे यावेळी सांगितले.
या स्वयं रोजगाराच्या प्रणेत्या सौ.अंजुमताई कांदे उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाल्या की, तुमच्या भरवश्यावर ही इतकी मोठी धाडसी उडी घेतली आहे. आणि यात जी गुंतवणूक करणार आहोत. त्यात शासनाचा एक रुपया ही नाही. सर्व स्वनिधी आहे. आणि आपल्या आमदारांनी तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी हे पैसे आपल्याला उसने दिले आहेत. त्यामुळे आपणही तितक्याच जबाबदारीने काम करून अण्णांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे,आपल्या कुटूंबाची प्रगती साधायची आहे. स्त्री पुरुष तुलना करत बसण्यापेक्षा कुटूंबाचे हित जोपासून आर्थिक उन्नती साधायची आहे. या स्वयं रोजगारातून प्रत्येक महिलेला दर दिवशी किमान २०० ते २५० रुपये कमावता येतील. असेच उद्योग आपण निवडले आहेत.असे सौ. कांदे म्हणाल्या.
याप्रसंगी अँड.विद्या कसबे, हसीना शेख, ज्योती महाजन, सुनीता कदम, सविता नवले, श्री. महिरे, यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच सौ. कांदे यांचा वाढदिवस यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मेळाव्यानंतर शहरातील गुप्ता लॉन्स येथील कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणाऱ्या मशीन प्रदर्शनाचे उदघाट्न आ.सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले. सर्व महिलांनी पाहणी करून वापराबाबतची तपशीलवार माहिती जाणून घेतली. यात कापूर, अगरबत्ती, कापूस वात, डाळ मिल, पत्रावळी, टिशू पेपर, सोलर ड्रायर, केळी चिप्स, पापड, ऑफसेट, आईस्क्रीम, ऊस रसवंती, पिठाची गिरणी, मिर्ची ग्राईडर, स्क्रबर, पॉपकॉर्न, शेवई, आदीसह शेकडो मशीन चे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात पाहण्यासाठी खुले असणार आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, अप्पा कांदे, सागर हिरे, शशी सोनावणे, सुनील जाधव, लाला नागरे, भावराव बागुल, प्रकाश शिंदे,आदीसह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी भगिनी, युवासेना, तसेच मतदार संघातून आलेल्या हजारो महिला, बचत गटाच्या सदस्या,आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.
.
0 Comments