सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष काटेरी झुडपे देताहेत अपघातास निमंत्रण

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातुन जाणाऱ्या ४० गांव ते चांदवड नॅशनल हायवे क्रमांक ७५३ जे यावर नांदगांव हाद्दीत शांतीबाग ते गिरणा काॅलणी एसटी डेपो, फुलेनगर ते नांदगांव, गंगाधरी आदी सह विविध ठिकाणी रस्त्याच्या किनारी काटेरी बाभळींनी साईड पट्टया व्यापल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हे काटेरी झुडपे अपघातास निमंत्रण देताहेत.

असाच प्रकार तालुक्यातील सर्वच मुख्य व राज्य मार्गांवर आढळुन येत असून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला शेती असलेल्या अनेकांनी दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या नाल्या बुजवून आपल्या शेतीचे बांधच रस्त्याला लागून आनले असल्याचे चित्र दिसत असताना नांदगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने बर्याच ठिकाणी दोन चार चाकी गाड्या सुध्दा मोठ्या मुश्किलीने काढाव्या लागतात.

ठिकठिकाणी या काटेरी बाभळींची वाढ झाल्याने रस्त्यावरून वावरताना वाहनावरून प्रवास करताना काटेरी बाभळीच्या फांद्या वाहनाला लागून क्रँचेस जाने, दुचाकिवरुन जाताना फांद्या तोंडाला डोळ्याला अंगकाठी लागून इजा होत असल्याचे प्रकार घडत आहे. या काटेरी झाडे व फांद्या तोडून रस्ता मोकळा करावा, त्याच प्रमाणे तालुक्यातील सर्व रहदारीच्या रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांनी तसेच मानवनिर्मित झालेले अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घ्यावी अशी मागणी तालुक्यातील नागरीकानी केली आहे. सदर काटेरी फांद्या व झाडे वेळेत न तोडल्यास आम्ही नागरीक स्वता काटेरी फांद्या तोडून रस्त्यावर टाकून रस्त्यावर आंदोलन करु असा इशारा नागरीकानी रस्ता मेंटनस करणार्या संबंधित यंञनेला दिला आहे .सा.बा विभागाने देखील या कामी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments