नांदगांव तालुक्यात पुरेसा पाऊन नसल्याने दुष्काळ सद्रुष्यस्थीती.

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव तालुक्यात खरीप हंगाम सुरु होऊन अडीच महिने झाले, सुरुवातीला झालेल्या पावसावर खरीप पेरण्यात झाल्या तेव्हा पासून अधुन मधुन येणार्या रिमझिम पावसात पिकांना आतापर्यंत जिवदान मिळाले. परंतु नद्या नाल्यांना अद्याप दमदार पाऊस नसल्याने गाव खेड्यात असलेल्या लहान मोठ्या पाझर तलाव,माती बांध कोल्हापूर पध्दतीचे बंधारे सिमेंट प्लग बंधारे कोरडे ठाक पडलेले आहेत.तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

जातेगाव येथील तळ गाठलेली विहीर अशीच परिस्थिती सगळीकडे आहे.

सविस्तर वृत्त असे की पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यात जमा आहे, सुरुवातीला झालेल्या थोड्या फार पावसावर शेतकरी बांधवांनी तालुक्यात सगळीकडे खरीपाच्या पेरण्या केल्या. परंतु अधुन मधुन येणार्या रिमझिम पावसाच्या सरींवर पिकांना आतापर्यंत जिवदान मिळाले, पण जोरदार पाऊस नसल्याने नद्या नाल्यांना पाणी अद्याप पाणी आले नाही,पिकांची स्थिती चांगली असली तरी देखील पुरेशी भुक भागली नाही.
पाण्याअभावी कोरडे ठाक पडलेला पाझर तलाव

शेतकरीवर्ग जोरदार पावसाची प्रतिक्षा बाळगूनआहे. पुरेसा पाऊस नसल्याने गाव खेड्यात असलेल्या लहान मोठे तलावात कोरडे ठाक पडलेले आहेत त्यामुळे विहीरींना पाणी उतरलेलं नाही कोरड्याठाक आहेत ,लहानमोठी बांध बंधारे, पाझर तलाव, मध्यम प्रकल्प मोठी धरणे यांच्या पाणी साठ्यात वाढ झाली नाही. तर बर्याच ठिकाणी कोरडे ठाक पडलेले आहेत.पहिल्या पावसात भरणारे मण्याड नदीवरील माणीकपुंज धरण,पांझन नदीवरील नाग्या- साक्या,ही धरणे कोरडीठाक आहे.तसेच गिरणाधरणात फक्त १६% पाणी साठा आहे, माणीकपुंज धरणाच्या मृत साठ्यातुन नांदगांव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरणे पाणी पुरवठा होत आहे.

पावसाळ्याची अडीच महिने उलटली पण आजुन २० ते २५ दिवसाने नांदगांव शहराला तालुक्यातील १७ गावांना उशीराने पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचे संकट आजुन कायम आहे, ज्या गावांना गिरणा धरण योजनेचे पाणी आहे त्या गावांना देखील उशीराने पाणी पुरवठा होतो. धरणे बांध बंधारे कोरडी आहेत विहीरींनि तळ गाठला त्यामुळे खरीपा सोबत रांगडा व पोळ कांदा रोपे कशी पेरावी नंतर कांदा लागवड कशी करावी आणी उन्हाळा कांदा लागवडीचे काय? पुरेसा पाऊस न झाल्याने सन २०२४ च्या हंगामात पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय? त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आजुन दोन ते अडीच महिने पिके उभी राहणार आहे पाऊस पडला तर कनसात दाने भरतील शेतकर्यांनी महागडी बियाने महागडी खते लाऊन मोकळा झाला आणी आता पावसाची वाट बघत बसला. पाऊस नसल्याने नदी,नाले,ओढे,व लहान मोठी बांध बंधारे कोरडीच आहे तेव्हा खरीप हंगामा नंतर रब्बी हंगामाचे काय? तालुक्यात सिंचनासाठी पुरेशी सोय नसल्याने विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती विहीरीनी तळ गाठल्याने कांदा लागवडीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

दरम्यान पाऊस पुरेसा नसल्याने भाजीपाल्यासह, मका व इतर पिकावर देखील अळींचे आळींचा प्राद्रुर्भाव वाढला आहे, मकासह जवळपास सर्वच पिकाचे पाने व शेडे कुरतडण्याचे प्रमाण अधिक आहे.

Post a Comment

0 Comments