बिबट्याने पाळीव प्राण्यांना आपले भक्ष बनवल्याने त्याच प्रमाणे रानडुक्करांनी शेती पिकांचे केलेल्या अतोनात नुकसानीच्या मोबदल्यात नांदगाव वन विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे नुकतेच वितरण करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २०२३ च्या खरीप हंगामात नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील मौजे लोढरे येथील लोढरा प्रमोद भानुदास निकम यांच्या तीन बकर्या आणि बंडु पुंजाबा पोकळे यांची एक बकरी खाल्याने त्यांना आणि राजेंद्र शांताराम सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शेषराव गायके रा .ढेकू, सुदाम श्रीपत वतार व पोपट महादु निंबारे रा. (चंदणपूरी) जातेगाव येथील प्रकाश तान्हाजी सोनवणे या शेतकऱ्यांचे रानडुक्करांनी मका व इतर शेती पिकांचे नुकसान केल्याने त्यांना त्याचप्रमाणे रामजी भिमा पवार रा. लोहशिंगवे, प्रकाश रमेश चव्हाण रा. पिंपरखेड, नंदु वाल्मिक पराशर रा. माळेगाव या दहा शेतकऱ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दीपक वडगे यांनी धनादेशाचे वितरण केले.
0 Comments