चिंचविहीर येथे बछड्यासह बिबट्या मुक्कामी असल्याने नागरिकांची माञ झोप उडाली आहे. त्याने दि. २ रोजी पहाटे ४ वा कैलास संपत वाबळे यांच्या घरा बाहेर गोठ्यात बांधलेल्या बैल (गोर्हा) बिबट्याने नरडीचा घोट घेतला.
या घटनेने चिंचविहीर येथील नागरीक भयभित झाले असून या नागरीकाना दिवसा घराच्या बाहेर निघने मुश्कील झाले आहे. गत १५ दिवसापूर्वी बिबट्याचा बछडा गुलाब दाणेकर यांच्या विहीरत पडल होते. त्यास वन विभाग आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचवीले वाचविण्यात नागरीक व वन विभागाला यश मिळाले नाशिक ची वनविभागाची टिंम येथे येऊन त्या बछड्याला तपासून तेथेच सोडण्यात आले. तो बछडा अडीच महिण्याचा झाल्याने गुर्र…गुर्रु लागला आहे. त्याच्यामुळे या गावात पै पाहुना देखील कोणी यायला तयार नसल्याचे समजते.
बिबट्याच्या दहशतीने वावरत आहे विद्यार्थी शाळेत जायला तयार नाही महिलांना व पुरुष शेती कामाला अडथळा आला आहे. त्यामुळे शेतावरीला कामे ठप्प झाली आजुन काही दिवसांत शेतातील मका, बाजरी आदी पिके काढणीस येथील त्या नंतर कापणीला मजूर मिळतीला का? असा आनेक प्रश्न चिंचविहीर येथील रहिवाशांना भेडसावत आहे. त्याचा वावर पाच किमीच्या परिसरात असल्याने चिंचविहीर,जळगांव, बु!!कासारी या भागातील नागरीक गत दिड महिण्यात पासून दहशती- -खाली वावरत आहे. त्यास पकडण्यासाठी वन विभागाने सहा पिंजरे लावले पण हरीण कुञे आदींना आपले भक्ष करत असल्याने अद्याप पिंजऱ्यात पर्यंत आला नाही.
दरम्यानच्या काळात त्याने विक्रम दाणेकर यांच्यावर हल्ला केला होता, काल दि २ रोजी दुपारी बिबट्याने हल्ला केलेल्या बैलाचा वनविभागाने पंचनामा केला. सध्या त्याच्या दहशतीमुळे नागरिकांचे दळकर वळण जवळपास दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे या गावात पै पाहुना देखील कोणी यायला तयार नाही वाड्या वस्तीवर व एकटी दुकटी राहणारे रहिवाशी सतत त्याच्या दहशतीने ञस्त झाले. शेतातील मशागत करणे अवघडच, भाजीपाला काढणं मुश्किल झाल्याने खराब होत आहे. तसेच कांदा लागवड किंवा कांदा रोप टाकने इत्यादी कामे लांबणीवर पडले आहे.
तर नांदगाव शहराजवळ फुलेनगर येथे बिबट्याच्या जोडीने दर्शन दिल्याने नागरीक भितीने वावरत आहे बिबट्या नंतर फुलेनगर भागात तरस व रान डुकार इत्यादी वन्य प्राण्यांचा मुक्त वावर दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी दहशतीखाली वावरत आहे. वनविभाची जनजागृती चालू आहे.
0 Comments