नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य. विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत इ .मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी माहिती दिली व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.यामध्ये कीर्ती सोळसे, लावण्या जगधणे, आयेशा बेग,सागर गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षक विजय गायकवाड यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक शरद पवार यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना त्यांचे विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत, गोरख डफाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी तर केतन दळवे यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments