होरायझन अकॅडमी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या, नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष- -स्थानी अकॅडमीच्या प्राचार्या श्रीमती.पुनम डी.मढे ह्या होत्या.या वेळी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या श्रीमती.पुनम डी.मढे यांच्या हस्ते संपन्न झाले. इयत्ता चौथी व पाचवी च्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील माहिती उपशिक्षिका श्रीमती. दिप्ती निकम यांनी मांडले त्या म्हणाल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ख्यातनाम आहेत.बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी,शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता,वकील व भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते.


भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेते म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या महाराष्ट्राला थोर समाजसुधारक विचारवंत,कवी,संत,साहित्यिक अशी परंपरा लाभलेली आहे.लोकमान्य टिळक,वि. दा. सावरकर,संत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत.यातील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे.परंतु अशी कुठली व्यक्ती आहे की जी या सर्व उपाध्या धारण करू शकते तर या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर म्हटले की सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.समाजाला आपल्या साहित्यातुन एक नवी दिशा देण्याचे काम थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.अनुराधा खांडेकर यांनी केले.तसेच शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments