जातेगाव व न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटाच्या आढावा बैठक शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना तत्काळ लाभ द्या - गट विकास अधिकारी दळवी

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव आणि न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, आरोग्य विभाग कर्मचारी,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी, रोजगार सेवक यांची संयुक्त बैठक (आढावा मेळावा) जातेगाव येथील आई लॉन्स येथे गट विकास अधिकारी संतोष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, प्रलंबित घरकुलांचे कामे, १५ वित्त आयोगातील खर्च झालेला व शिल्लक निधी इत्यादी विषयांवर शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आला.

आढावा बैठकीस मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी संतोष दळवी आणि अधिकारी 

या प्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विजय ढवळे, आरोग्य विस्तार अधिकारी अमोल कठाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप प्राची पवार महिला व बालकल्याण अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना उद्देशून गट विकास अधिकारी दळवी म्हणाले की तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेतील शिक्षक मोठ्या प्रमाणात विनारजा गैरहजर असतात,त्यांना समज देण्यात यावी. स्थानिक नागरिकांच्या काही तक्रार आल्यास दांडी बहाद्दर शिक्षकाची गय केली जाणार नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनापुर्वी लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांनी संयुक्त काम करावे.काही अडचणी असतील तर सांगा पुन्हा आपणास प्रशिक्षण देण्यात येईल गट विकास अधिकारी सांगीतले.

जातेगाव आणि न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटातील लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या १८५७७ असून आतापर्यंत फक्त ९२५८ महिलांचे कागदपत्रे ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. तर ९३१९ महिलांचे कागदपत्रे अद्याप ऑनलाईन करणे बाकी आहे, ते तत्काळ ऑनलाईन करुन घ्यावी. दि.६ऑगष्ट पर्यंत ज्या महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी दिलेले कागदपत्रे ऑनलाईन होतील अशा सर्व महिलांना रक्षाबंधनापुर्वी ३००० रुपये मिळणार आहेत . व नंतर ज्या महिलांचे कागदपत्रे ऑनलाईन होतील अशा सर्व महिलांना १५०० रुपये मिळणार असल्याचे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्राची पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचारी यांना म्हटले की, वरील योजनेचे रात्र पहाट करून लवकरात लवकर टारगेट पुर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांनी संयुक्त काम करावे.
यावर अंगणवाडी सेविका व आशा कर्मचार्यांनी यांनी ऑनलाईन करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत, तर अनेक महिलांचे बॅंकेत खाते नाही, कुणाचे आधार कार्ड नाही, शिधा पत्रिका नाही, जन्माचा दाखला नाही इत्यादी कागदपत्रे नसल्याने अडचणी येत आहेत असे   सांगितले.यावेळी मार्गदर्शन करताना महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पवार यांनी अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना कार्यक्रम आटोपल्या- नंतर वरील योजने बाबत स्वतंत्र मार्गदर्शन केले.

यानंतर न्यायडोंरी आणि जातेगाव जिल्हा परिषद गटातील असलेल्या गावांमध्ये एकुण घरकुल लाभार्थी पैकी २६१ अपुर्ण घरकुलांचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना एका पाठोपाठ एक अशा चार नोटीस बजावण्यात याव्यात तरी सुद्धा त्यांनी शासनाकडून अनुदान घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले नाही  तर त्यांच्याकडून दिलेला निधी परत घ्यावा आणि संबंधितांनी घेतलेले अनुदान परत केले नाही तर त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवा किंवा फौजदारी कारवाई करावी. त्याशिवाय दुसऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार नाही. असे गट विकास अधिकारी संतोष दळवी यांनी स्पष्ट केले.

तर ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विजय ढवळे  यांनी न्ययडोंगरी व जातेगाव जिल्हा परिषदेच्या गटातील एकुण गावे २७ गावांना विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या शासनाचा १५ वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीपैकी सुमारे ६ कोटी रुपये शिल्लक आहेत.तरी ज्या गावांचा वित्त आयोगाचा निधी शिल्लक राहिला आहे त्यांनी तत्काळ तो गावच्या विकासासाठी खर्च करावा, अन्यथा १६ व्या वित्त आयोगाची रक्कम आपल्या ग्रामपंचायतीला मिळणार नाही. असे सांगताना उपस्थित ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी येथील चवाडी मळा परिसरातील वस्तीवर जाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेला रस्ताला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून चिखल तुडवत शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जाने येणे करावे लागते. आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते तरी सदरील रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून दुरुस्ती करण्यात यावी याबाबत शेतकरी बांधवांनी निवेदन दिले तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची असलेली संरक्षण भिंत अंगणवाडीचे बांधकाम करण्यासाठी पाडली आहे. तरी संबंधित ठेकेदाराकडून आरोग्य केंद्राची संरक्षण भिंतीचे बांधकाम करून घेतल्या शिवाय त्याचे अंगणवाडीचे बांधकामाचे बिल अदा करू नये याबाबत नागरिकांनी विषय मांडला, त्यावर गटविकास अधिकारी दळवी यांनी होकार देत भिंत बांधून घेण्याबाबत ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांना सूचना केल्या.

यावेळी दोन्ही जिल्हा परिषद गटातील गावांचे ग्रामसेवक, प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, आरोग्य विभागाचे कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांच्यासह येथील सरपंच सौ. शांताताई पवार उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, सदस्य बाळासाहेब लाठे, संदीप पवार, शाबेराबानो शेख, सौ.कांताबाई खिरडकर, मनिषा पगारे, पुजा जाधव, कल्पना गायकवाड यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान खिरडकर यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांनी केले  उपस्थित मान्यवरांचे आभार ग्रामपालिका सदस्य  संदीप पवार यांनी मानले.जातेगाव ग्रामपालिकेच्या वतीने उपस्थितांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बैठकीची सांगता करण्यात आली. 

  
 




Post a Comment

0 Comments