रेल्वे रुळाजवळ आढळला ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव लोहमार्गावर धावत्या प्रवासी गाडीतून पडून एका अन ओळखी अंदाजे (वय ३५ वर्ष) पुरुषाचा मृत्यू झाला आहे, या घटनेची नांदगांव रेल्वे पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नांदगाव लगत रेल्वे रुळाजवळ एका अंदाजे वय ३५ वर्ष असलेला अन ओळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. त्याची उंची ५.७, रंग गोरा, शरीरबांधा सडपातळ, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे, नाक सरळ, बारीक डोळे,  काळी मुश असुन त्याच्या एका हातावर जयभिम, तसेच दुसर्या हातावर सुरेखा व आय लव यु बादमी आकाराचे चिन्ह गोंदलेले आहे. हा तरुण चालत्या रेल्वे प्रवासी गाडीतून पडून गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे.असे प्रथम दर्शनी नोंद झाली असून घटनेचा तपास नांदगांवचे लोहमार्ग पोलीस अमलदार कैलास चौधरी हे करीत आहे. सदर इसमा बाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ओळखीचा असल्यास 

 8855068686 नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments