कुंभमेळ्याच्या कृती आराखड्यात पिनाकेश्वर देवस्थानाच्या विकास कामांचा समावेश करावा

Bay- team aavaj marathi 

सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, येथे दर बारा वर्षांनी असतो, दर बारा वर्षांनी होणारा हा कुंभमेळा यापूर्वी सन २००३/ ०४ साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा झाला होता.२०२६/२७ होणार आहे. या कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या कृती आराखड्यामध्ये निमित्ताने जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरानंतर पर्यटन विकास विभागाने ड वर्गाचे पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा दिलेले, जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महादेवाचे मंदिर असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र स्थापित जातेगाव येथील श्री. पिनाकेश्वर महादेव मंदिराचा देखील विकास आराखड्यामध्ये समावेश व्हावा अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, हिंदू धर्मातील पवित्र महा कुंभ मेळाव्यात येणाऱ्या साधू महंतांच्या आणि देवदर्शनासाठी देश विदेशातील भाविक लाखोंच्या संख्येने येतात. कुंभमेळ्यातील प्रमुख आकर्षणे म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, मुक्तिधाम मंदिर,काळाराम मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिर,पांडवलेणी गुंफा,श्री सोमेश्वर मंदिर, नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर येथील श्री शनि महाराज मंदिर, जातेगाव येथील प्रभू श्रीराम स्थापित श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर इत्यादी देवस्थानास येणारे भाविक भेट देवून देवाचे दर्शन घेतात. व पर्यटनाचा आनंद घेतात.

या पवित्र महा कुंभमेळा सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या साधू महंतांची आणि येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी नाशिक येथील महानगर पालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग या सह विविध शासकीय यंत्रणा ज्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतात यांचे हजारो कोटी रुपयांचा विकास आराखडा मे.जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. त्याप्रमाणे विकास कामे केल्या जातात. यात नाशिक जिल्ह्यातील श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबक राज महादेव देवस्थान नंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रभु श्रीराम स्थापित श्री पिनाकेश्वराचे महादेव पुरातन देवस्थान हे विकास कामांपासून कोसो दूर असून येथे अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधा, अद्यावत दर्शनबारी, भक्त निवास, स्वच्छता गृह, भंडार गृह, व्यापारी संकुल देवस्थान ट्रस्टचे कार्यालय इत्यादी आवश्यक सुविधांची उणीव आहे. महाकुंभ मेळ्याच्या काळात आणि दर वर्षी पवित्र श्रावण महिन्यात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते, ह्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ वाढेल.

 त्यातून परिसरातील शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल तरी महाकुंभ मेळाव्याच्या विकास आराखड्या मध्ये जातेगाव येथील प्रभू श्री  रामचंद्र स्थापित श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर येथील विकास कामांचा आराखड्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि भाविकांनी केली आहे.

.





Post a Comment

0 Comments