नांदगाव,ता २८ नजीकच्या दिवसावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर तयार होत असलेल्या विकास आराखड्यात देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनि पिठाचा अंतर्भाव करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सुहास कांदे यांचा शनी मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. आ. सुहास अण्णा कांदे व शनी मंदिर देवस्थाने प्रमुख विश्वस्त माजी आ. अँड अनिल आहेर, माजी सभापती विलासराव आहेर यांच्यात अनेक विषयावर झालेल्या चर्चेत प्रामुख्याने श्री क्षेत्र नस्तनपूर या तीर्थस्थळाच्या सर्वांगीण विकासावर विचारविनिमय झाला गेल्या वर्षी आमदार सुहास कांदे यांनी नस्तनपूर च्या तीर्थस्थळाला धार्मिक पर्यटनाचा ब वर्गाचा दर्जा मिळवून दिला. याचाही संदर्भ या बैठकी दरम्यान होता. याशिवाय यावेळी झालेल्या चर्चेत अँड आहेर यांच्यासह देवस्थान च्या अन्य विश्वस्तांनी आमदार कांदे यांचे श्री क्षेत्र नस्तनपूर चा समावेश कसा करून घेता येईल याकडे लक्ष वेधले. कुंभमेळा काळात श्री क्षेत्र नस्तनपूर चे महत्व अधोरेखित होण्यास हातभार लागण्यास मदत होईल यासाठीचे संकेत या बैठकीतून दिले गेले.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात त्यात श्री क्षेत्र नस्तनपूर चे शनिदेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा सहभाग असतो कुंभ मेळ्यात नाशिकला श्री क्षेत्र नस्तनपूर चे अध्यात्मिक महत्व लक्षात येण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ठळक फलक लावावेत व त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाला निर्देश देण्यात यावेत. त्याचप्रमाणे आमदार सुहास कांदे यांनी शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरु करावे.अशी मागणी या बैठकीत माजी आमदार अँड अनिल आहेर यांनी व अन्य विश्वस्तांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे केली याबाबत संबंधितांना अवगत करू त्याचप्रमाणे या तीर्थस्थळाचे महत्व लक्षात घेता त्याच्या सर्वागीण विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून व शनीभक्त म्हणून आपले योगदान निश्चित असेल असेही आश्वासन आ. कांदे दिले.
यावेळी माजी सभापती विलासराव आहेर खासेराव सुर्वे, भागवत वाबळे,उदय पवार,शिवराम कांदळकर ,कैलास गायकवाड, विजय चोपडा,हरेश्र्वर सुर्वे ,उदय पाटील,नूतन कासलीवाल,मनमाड बाजार समितीचे संचालक अशोक डघळे, डॉ पुंजाराम आहेर विजय गुढेकर, सागर साळुंके, नाना चव्हाण, वैभव वाघ अकील शेख आदी उपस्थितीत होते.
0 Comments