सरपंच व ग्रामपंचायत लिपिक दोन लाख रुपये लाच घेताना ईडीने रंगेहाथ पकडले गुन्हा दाखल

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील 
सरपंच राजेंद्र महादू मोर, ग्रामपंचायत लिपिक शांताराम तुकाराम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५०० चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याने त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने दहा लाख रुपयांची मागणी करून तडजोडी तुन पाच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करून त्यापैकी दोन लाख रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे यांच्या हस्ते स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

लाचेची रक्कम स्विकारताना सरपंच, लिपिक आणि मध्यस्थी यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे पथक 

सविस्तर वृत्त असे की, सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजर चौरस फूट प्लॉटची कायमस्वरूपी खरेदी द्यावी किंवा दहा लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी केली असता तडजोडी अंती ५ लाख रुपये लाच घेऊन वरील प्रकरणाचा निपटारा करण्याचे ठरले.त्यानुसार लाचेची रक्कम दिनांक २६ डिसेंबर रोजी बहाळ येथे तक्रारदार यांच्या राहते घरी खाजगी इसम सुरेश ठेंगे यांच्याकडे देण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे त्याच दिवशी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता, ठरल्याप्रमाणे 
 लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता दोन लाख रुपये खाजगी इसम सुरेश ठेंगे हा घेण्यासाठी आला असता त्यास लाचेची रक्कम स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार सरपंच राजेंद्र महादू मोरे आणि ग्रामपंचायत लिपिक शांताराम तुकाराम बोरसे व खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




वरील कारवाई नाशिक चे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी सापळा रचून केली. वरील घटनेमुळे ग्रामपंचायत सरपंच व लिपिक यांचे पितळ उघडे पडले असून याची चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.



Post a Comment

0 Comments