नांदगाव तालुक्यात पशुधनाचा जिव धोक्यात पाळीव प्राण्यांवर साथीच्या रोगाचे थैमान

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यात गाई, गुरे,शेळ्या,मेंढ्या इत्यादी पाळीव प्राण्यांवर साथीच्या रोगाने थैमान घातले असून,पशुधनाचा जिव धोक्यात आले आहे. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले असून काही केल्या साथीच्या आजारांवर नियंत्रण येत नसल्यामुळे जनावरांचे दगावन्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

 पशुपालकांनी या संदर्भात व्हेटर्नरी ॲम्ब्युलन्स बोलून काही उपचार करून घेतले, मात्र त्यातही समाधान झालेले नाही. अजूनही जनावर मरण्याचे काम सुरूच आहे शेळ्यांचे साथीच्या आजारांचे प्रमाणात अधिक वाढ झालेली आहे. साथीच्या रोगांनी शेळ्या मरण पावत चालले आहे यावर तात्काळ आणि रामबाण उपाय यांची गरज असल्याची मागणी पशुपालकांनी केली आहे जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वामन टिळेकर, भगवान खैरनार व अन्य पशु पालकांचे जनावरे दगावली असून शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागत आहे.

पशुधन वाचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न गरजेचे 

पशुधन वाचविण्यासाठी शासनस्तरावर साथीचे रोग टाळण्यासाठी प्राण्यांना आवश्यक लसीकरण करणे, आजारी प्राण्यांसाठी वैद्यकीय पथक पाठवून तातडीने उपचार करणे, गावागावात पशुवैद्यकीय केंद्रे उपलब्ध करून देणे, पशुपालकांना रोगांची लक्षणे ओळखण्याचे व योग्य काळजी घेण्याचे प्रशिक्षण देणे, गावोगावी आरोग्य शिबिरे भरवून प्राण्यांची तपासणी करणे,परिसराची स्वच्छता: प्राण्यांच्या गोठ्यांची स्वच्छता व रोगप्रसार टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे, प्राण्यांसाठी स्वच्छ व पौष्टिक खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करणे, रोगामुळे मरण पावलेल्या प्राण्यांच्या मालकांना शासनाकडून आर्थिक मदत व विमा भरपाई देणे,साथीच्या रोगांचा अभ्यास करून भविष्यातील धोके टाळण्यासाठी संशोधनावर भर देणे, औषधांच्या उपलब्धतेसाठी स्थानिक पातळीवर उत्पादन वाढवणे,.जनावरे आजारी पडल्यास पशु पालकांना ठीक टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करणे आवश्यक जेणेकरून ते तातडीने मदत मागू पशु मालकास मदत होवू शकते शासनाने इत्यादी उपाययोजना तत्काळ राबविल्यास पाळीव प्राण्यांचे जीव वाचवणे व पशु पालकांचे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

Post a Comment

0 Comments