चिमुकलीला लागली भगवतीच्या दर्शनाची ओढ, स्वतः चढली चक्क गडाच्या ४५ पाहिऱ्या

 Bay -team aavaj marathi 

प्रज्ञानंद जाधव
नांदगाव तालुका प्रतिनिधी (नाशिक)

देवी सप्तशृंगी (भगवतीच्या) अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील विसपुते परिवारातील एक वर्षीय परी नावाची कन्या असून तीच्या पहिला जन्म दिवसाच्या निमित्ताने परी च्या आई वडिलांनी तीला नांदुरी येथील देवी सप्तशृंगी च्या दर्शनासाठी घेऊन आले होते. यावेळी एक वर्षांच्या परीला जनु भगवतीच्या दर्शनाची ओढ लागल्यासारखी वणी गडावर चक्क स्मित हास्य करत गुडघ्यावर चालत (रांगत) पाहिऱ्यांवर गड चढण्यास सुरुवात केली. तीने थोड्या तितक्या नाही तर चक्क गडाच्या ४५ पाहिऱ्या चढली. हे दृश्य पाहून देवीच्या दर्शनासाठी आलेले इतर भक्त देखील याप्रसंगी अचंबित झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील 
विसपुते परिवारातील आपल्या लाडक्या परीचा जन्म दिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिनानिमित्त सप्तश्रुंगी गड येथे आपल्या कुटूंबातील सदस्यांसह दर्शनासाठी देवी सप्तश्रुंगी च्या गडावर आले असता सहकुटुंब पाहिऱ्या चढत असताना थोडा वेळ थकवा लागल्याने थांबून मग गडाच्या पाहिऱ्या चढाव्यात म्हणुन थांबले असता अचानक त्यांची एक वर्षीय लाडकी कन्या परी गोविंद विसपुते वय वर्ष एक हिने नवस फेडावा असा परीक्रमा करत तब्बल ४५पाहिऱ्या स्मित हास्य करीत चढत आपल्या माता पित्यासाठी दीर्घायुष्य वाढावे म्हणुन जणु देवीला साकडेच घातले असल्याचे दर्शनासाठी आलेले भाविकांनी अनुभवले आहे हा क्षण तिच्या वडिलांनी कॅमेरात कैद केला आहे.

छोटीशी परी गडाच्या पाहिऱ्या तढतानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://youtube.com/shorts/0MG1_Sclubs?feature=shared

तिच्यामागे जी चालत आहे, ती तिची आई आहे भगवतीची खरी श्रद्धा मनात ठेऊन अशी ही माया तिच्या डोळ्यात हास्यात दिसत होती. हा मन प्रसन्न करणारा हा अविस्मरणीय क्षण तिच्या माता, पित्यांनी, बहिणी, नातेवाईकांनी,भाविकांनी, बघितला आहे हा विडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर या चिमुकलीचे खुप कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments