नांदगाव येथून चोरी गेलेला मालवाहू ट्रक चा चोर पकडण्यात 3 महिन्यानंतर नांदगाव पोलिसांना यश आले आहे. सदर संशयित आरोपी नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहे. दि. 3 ऑगस्ट 24 रोजी चोरी गेलेल्या मालवाहतूक ट्रकचा संशयित आरोपी रमजान खान अमीन खान पठाण यास जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेने चोरीचे मोठ रॅकेट उघड होऊन या चोरीच्या ट्रक, मोटर सायकली यांची कशी विल्हेवाट लावली जाते? या संदर्भातचा उलगाडा होण्याची शक्यता होण्याची शक्यता आहे. फिर्यादी नितीन कचरू पवार रा. नांदगाव यांनी नोंदविल्या गुन्हा रजिस्टर नंबर 420/2024 ट्रक नंबर एम एच 41- G 5572 माल ट्रक संशयित चोराने मध्यरात्रीच्या वेळेला नांदगाव येथील माल धक्का येथून चोरून नेला होता. हा ट्रक चोरी गेल्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड स्टेशन फाटा येथील टोल नाक्यावर तो ट्रक सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता. त्यावरून पुढील तपास नांदगाव पोलीसांनी कसोशीने चोराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अधिकारी राजेंद्र मोरे, मुद्दतसर शेख हे तपास करत असून संशयिताकडून अजून चोरी गेलेल्या वाहनांची तपास लागण्याची शक्यता असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.
0 Comments